ETV Bharat / state

कोरोनाच्या मुकाबल्यासाठी शिर्डीचे साई संस्थान धावले.. ५१ कोटींची मदत जाहीर - sai baba trust

साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shirdi sai baba trust
साई संस्थानची मदत
author img

By

Published : Mar 27, 2020, 6:31 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी ५१ कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. हा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

डोंगरे म्‍हणाले, जगभरात व देशाभरात थैमान घालणा-या कोरोना व्‍हायरसच्‍या मुकाबल्‍यास तोंड देण्‍यासाठी केंद्र व राज्‍य सरकार सज्‍ज झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या वतीने या संकटाचा मुकाबला करण्‍यासाठी ५१ कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या तदर्थ समितीने घेतला आहे.

साई संस्थानची कोरोनाच्या संकटसमयी मदत

संस्‍थानचे श्री साईप्रसादालयाच्‍या वतीने श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयातील रुग्‍ण व नातेवाईक, शिर्डी परिसरातील अनाथ आश्रम, वृध्‍दाआश्रम, मुखबधीर विद्यालय, बंदोबस्‍तावरील पोलिस कर्मचा-यांना, शिर्डी बस स्‍थानकावरील निराधार व गरजुंना आणि संस्‍थानच्‍या व शासकीय कार्यालयातील सरंक्षण, स्‍वच्‍छता व इतर कार्यरत कर्मचा-यांना निशुल्‍क भोजन पुरविण्‍यात येत आहे. खेडोपाडी बंदोबस्‍तावर असलेल्‍या पोलिस कर्मचा-यांना अल्‍पोहारासाठी आज पासून ३ हजार बुंदीची व ३ हजार चिवडयाची पाकीटे जिल्‍हा पोलिस मुख्‍यालयाला देण्‍यात येत आहेत. संस्‍थानच्‍या वतीने यापुर्वी ही राष्‍ट्रीय व नै‍सर्गिक आपत्‍तीत वेळोवेळी मदत केलेली आहे. यामध्‍ये केरळ मधील पुरामुळे आपदग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी ५ कोटी, राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १२ कोटी तसेच पुलवामा येथील शहीद झालेल्‍या जवानांच्‍या कुटुंबीयांच्‍या मदतीकरीता २.५१ कोटी रुपये निधी देण्‍यात आलेला असल्‍याचेही श्री.डोंगरे यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे आदि उपस्‍थित होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.