संगमनेर अहमदनगर तालुक्यातील साकुर गावात एका माकडाने काही दिवसांपासून चांगलीच दहशत घातली होती त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 25 जणांहून अधिक जणांवर या माकडाने हल्ला केला होता. या माकडाला पकडण्याचे प्रयत्न वन विभागाने केले मात्र, तो काही जेरबंद होईना माकडाला तर पकडायच होतं मग एक वेगळी शक्कल लढवली गेली. वनविभागाने माकडीणीला आणत तिच्या आमिषाने माकडाला जेरबंद करण्यात यश caught monkey by honeytrap through female monkey in sangamner आले
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकूर गावात एका माकडाने काही दिवसांपासून दहशत माजवली होती तसेच बालके व ग्रामस्थांवर थेट हल्ले करत चावा घेत असल्याने घबराट पसरली होती बुधवारी सायंकाळी साकुर येथील दोन मुलींवर माकडाने हल्ला करत चावा घेत गंभीर जखमी केले होते जवळपास 25 व्यक्तींना माकडाने चावा घेत जखमी केल्याची माहिती आहे माकडाच्या या दहशतीने साकुरकर हैराण झाले होते वनविभागाला अनेक प्रयत्न करून यश येत नसल्याने अखेर वन अधिकाऱ्यांनी अनोखी शक्कल लढवत या माकडासाठी प्रेमाचा सापळा रचला या सापळ्यात हे माकड जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे
नागरिकांवर हल्ला करणाऱ्या या माकडाला पकडण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून साकूर गावात वनखात्याची रेस्क्यु टीम तळ ठोकून होती परंतु हे माकड कोणच्याही हाती लागत नव्हतं त्यासाठी किमान चार पिंजरे वेगवेगळ्या ठिकाणी लावले तरीही अद्याप हे माकड पकडण्यात यश आलं नाही अखेर साकुर गावाजवळून जाणाऱ्या तासकरवाडी रस्त्याला एक शिवारात हे माकड असल्याचे समजलं त्यासाठी एका माकडणीला त्या परिसरात आणण्यात आलं संबंधित माकड त्या माकडीणीच्या आमिषापोटी त्या ठिकाणी आले. ज्यानंतर त्याला रेक्स्यू करण्यात आलं
हेही वाचा Digital Rape जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप आणि शिक्षेची तरतूद