ETV Bharat / state

शिर्डी मतदारसंघात 'या' फॅक्टरमुळे सदाशिव लोखंडे दुसऱ्यांदा पोहोचले दिल्लीत

राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राधाकृष्ण विखेंनीही काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे शिर्डी मतदारसंघाचे चित्रच पालटले. अहमदनगर दक्षिणेतून सेनेने सुजयला मदत करावी आणि उत्तरेतून विखेंनी लोखंडेंना निवडून आणायचे असा अलिखित तहच झाला. त्यानुसार नगरचे मतदान झाल्यानंतर विखे पितापुत्रांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपली यंत्रणा सक्रीय केली. त्यामुळे लोखंडेना शिर्डीतून तब्बल १ लाख २० हजार मतांचे मताधिक्य मिळाले.

author img

By

Published : May 25, 2019, 3:27 PM IST

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी जल्लोष

शिर्डी - लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला साईबाबांचा तिसऱ्यांदा आशीर्वाद मिळाला. गेल्या निवडणुकीत नवखे असुनही पंधरा दिवसात खासदार झालेले सदाशिव लोखंडे यावेळी मतदारसंघात संपर्क कमी असतानाही विजयी झाले. राधाकृष्ण विखेंची निवडणुकीपूर्वी ४८ दिवसांमध्ये मिळालेली भक्कम साथ दुसऱ्यांदा विजयी होण्यासाठी मोलाची ठरली. सदाशिव लोखंडे हे तब्बल १ लाख २१ हजार मतांनी निवडून आले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विजयी जल्लोष

शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील पाच वर्षांत विकासाची अनेक कामे केली. मात्र, मतदारसंघात सुरुवातीची तीन वर्षे त्यांचा संपर्क फार कमी होता. पुढे शेवटीच्या दोन वर्षांत त्यांनी चांगलाच संपर्क वाढवला. त्यातच मतदारसंघातील निळवंडे धरणासाठी केंद्रीय स्तरावरुन २८०० कोटींचा निधी मिळविण्यात आलेले यश त्यांच्यासाठी लाभदायक ठरले. पुढे लोकसभा निवडणूक जाहीर होताच शिवसेनेने त्यांनाच संधी दिली.

या दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राधाकृष्ण विखेंनीही काँग्रेसची साथ सोडली. त्यामुळे शिर्डी मतदारसंघाचे चित्रच पालटले. अहमदनगर दक्षिणेतून सेनेने सुजयला मदत करावी आणि उत्तरेतून विखेंनी लोखंडेंना निवडून आणायचे असा अलिखित तहच झाला. त्यानुसार नगरचे मतदान झाल्यानंतर विखे पितापुत्रांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आपली यंत्रणा सक्रीय केली. त्यामुळे लोखंडेना शिर्डीतून तब्बल १ लाख २० हजार मतांचे मताधिक्य मिळाले.

थोरांतचा प्रभाव नाहीच -

काँग्रेसने श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती. कांबळे हे विखे समर्थक असले तरी त्यांची उमेदवारी आणि निवडणुकीतली संपुर्ण यंत्रणा ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची होती. मात्र, निवडणुकींचा निकाल पाहिल्यास संगमनेर विधानसभा मतदार संघातूनच सेनेच्या उमेदवाराला साडे सात हजार मतांचा लिड आहे. मागील निवडणुकीशी तुलना करता तो पन्नास हजारांच्या लिडच्या मानाने कमी आहे. मात्र, थोरांतांचे मतदारांनी ऐकलेले नसल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पराभवाची कारणमिमांसा केल्यास असे दिसून येते की राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयत्यावेळी काँग्रेसला धक्का दिल्याने भाऊसाहेब कांबळे यांच्या विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर येथील ससाणे गटानेही कांबळेना मदत केली नाही. तसेच आघाडीतील नेत्यांनी प्रामाणिकपणे कांबळेंचे काम केले नाही. तसेच स्वत: कांबळेच्या विधानसभा मतदारसंघातून वीस हजारा मतांचा फटका बसला. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघा पैकी काँग्रेसला राष्ट्रवादीचा किल्ला असलेल्या अकोलेतून फक्त आघाडी मिळाली आहे. मतांच्या आकड्यांचा हिशेब पाहिला असता, तर वंचित बहुजन आघाडीच्या संजय सुखधान यांनी तब्बल ६२ हजारांहुन अधिक मते घेतली आहेत. परिणामी काँग्रेसच्या मतांचे विभाजन झाले. या निवडणुकीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेही अपक्ष उमेदवार म्हणुन होते. मात्र, त्यांना केवळ ३५ हजार मते मिळाली आहेत. नगरनंतर मोठ्या चर्चेच्या ठरलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात अखेर युवकांचे मतदान तसेच विखेंची यंत्रणेशिवाय मोदींचे स्थिर सरकार हाच फॅक्टर खरा ठरल्याचे चित्र दिसत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विधानसभा निहाय मतदान

अकोले विधानसभा मतदारसंघ

  • सदाशिव लोखंडे --- 49514
  • भाऊसाहेब कांबळे --- 81165
  • संजय सुखदान --- 3852

संगमनेर विधानसभा मतदारसंघ

  • सदाशिव लोखंडे --- 82216
  • भाऊसाहेब कांबळे --- 74591
  • संजय सुखदान --- 6005

शिर्डी विधानसभा मतदारसंघ

  • सदाशिव लोखंडे --- 103761
  • भाऊसाहेब कांबळे --- 40890
  • संजय सुखदान --- 13677

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ

  • सदाशिव लोखंडे --- 88643
  • भाऊसाहेब कांबळे --- 49344
  • संजय सुखदान --- 14140

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ

  • सदाशिव लोखंडे --- 86639
  • भाऊसाहेब कांबळे --- 65181
  • संजय सुखदान --- 14665

नेवासा विधानसभा मतदारसंघ

  • सदाशिव लोखंडे --- 72676
  • भाऊसाहेब कांबळे --- 52942
  • संजय सुखदान --- 10613

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी साईबाबा तिसऱ्यांदा पावले शिवसेनेला..गेल्या निवडणुकीत नवखे असुनही पंधरा दिवसात खासदार झालेल्या सदाशिव लोखंडेचा मतदार संघात संपर्क कमी असतांनाही यावेळी राधाकृष्ण विखेंचा अवघ्या 48 दिवसाचा भक्कम साथ आणि शिर्डी साईबाबांचा आशीर्वादाने लोखंडे दुसर्यांदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन 1 लाख 21 हजार मतांनी निवडून आलेय....

VO_ शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील पाच वर्षांत कामे केली मात्र त्यांचा मतदार संघात सुरवीतीची तीन वर्षे संपर्क कमी होता मात्र लोखंडेंनी शेवटीची दोन वर्षे संपर्क वाढवली आणि त्यात महत्वाचे म्हणजे मतदार संघातील निळवंडे धरणासाठी केद्री स्तरा वरुन 28 शे केटींचा निधी मिळविण्यात यश आले आहे यात शिवसेनेऩ विद्यमाम खासदार सदाशिव लोखंडेनाच तीकट दिले दरम्यान सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केल्याने आणि राधाकूष्ण विखे़नीही कॉग्रेसची साथ सोडल्याने मतदार संघाच चित्रच पलटले दक्षीणेतुन सेनेने सुजयला मदत करावी उत्तरेतुन लोखंडेंना निवडुण आण्याचा शब्द विखेंनी दिला नगरच मतदान झाल्या नंतर राधाकूष्ण विखे सुजय विखे यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात आपली यंत्रणा सक्रीय केल्याने लोखंडेना शिर्डीतुन 1 लाख 20 हजार मतांच मताधिक्य मिळालय....

VO_ कॉग्रेसने श्रीरामपुरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली होती कांबळे हे विखे समर्थक असले तरी त्यांची उमेदवारी आणि निवडणुकीतली संपुर्ण यंत्रणा ही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची होती मात्र निवडणुकींचा निकाल बघीतला तर संगमनेर विधानसभा मतदार संघातुन सेनेच्या उमेदवाराला साडे सात हजाराच लिड आहे ते मागच्या वेळेच्या पन्नास हजारांच्या लिडच्या मानाने कमी जरी असल तरी थोरांताच मतदारांनी ऐकलेले नसल्याच पहिला मिळतेय....

VO_ शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पराभवाची कारणे असे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी अन्यवेळी कॉग्रेस पक्ष सोडल्याने काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्या विधानसभा मतदार संघातील श्रीरामपुर येथील ससाणे गटानेही कांबळेना मदत न करण्याची भूमिका घेतली तसेच आघाडीतील नेत्यांनी प्रामाणिकपणे कंबळेंचे काम केले नाही तसेच आमदार असूनही स्वत्हाच्या मतदार संघातुन वीस हजाराने झालेली पिझाडी या सगळ्या कारणाने कंबळेना आपल्या विजया पासून प्रभावाला सामोरी जावा लागले आहे....

VO_ शिर्डी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघा पैकी कॉग्रेसला राष्ट्रवादीचा किल्ला असलेल्या अकोलेतुन फक्त आघाडी मिळाल्याच दिसुन आलय..मतांच्या आकड्यांचा हिशेब ब़घीतला तर वंचित बहुजन आघाडीच्या संजय सुख़धान यांनी तब्बल 62 हजारांच्या वर मते घेतली आहेत त्यातील काही मते ही कॉग्रेसचीच असनार आहेत या निवडणुकीत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरेंही अपक्ष उमेदवार म्हणुन होते ते कडवी झुंज देतील असे वाटत असतां त्यांचा मोठा संपर्क असुनही केवळ 35 हजार मते त्यांना मिळाली आहे..नगर नंतर मोठ्या चर्चीची ठरलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघात युवकांच मतदान तसेच विखेंची यंत्रणा आणि मोदींच स्थिर सरकार बनविण्यासाठी झालेल मदीन हाच फँक्टर खरा ठरलाय....

________________________________________

शिर्डी लोकसभा मतदार संघ विधानसभा निहाय मतदान

अकोले विधानसभा मतदार संघ

सदाशिव लोखंडे --- 49514
भाऊसाहेब कांबळे --- 81165
संजय सुखदान --- 3852

संगमनेर विधानसभा मतदार संघ

सदाशिव लोखंडे --- 82216
भाऊसाहेब कांबळे --- 74591
संजय सुखदान --- 6005

शिर्डी विधानसभा मतदार संघ

सदाशिव लोखंडे --- 103761
भाऊसाहेब कांबळे --- 40890
संजय सुखदान --- 13677

कोपरगाव विधानसभा मतदार संघ

सदाशिव लोखंडे --- 88643
भाऊसाहेब कांबळे --- 49344
संजय सुखदान --- 14140

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ

सदाशिव लोखंडे --- 86639
भाऊसाहेब कांबळे --- 65181
संजय सुखदान --- 14665

नेवासा विधानसभा मतदार संघ

सदाशिव लोखंडे --- 72676
भाऊसाहेब कांबळे --- 52942
संजय सुखदान --- 10613Body:MH_AHM_Shirdi Election PKG Story_24 May_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Election PKG Story_24 May_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.