शिर्डी - शिर्डीत गुरूपोर्णिमा उत्सवास ( Gurupornima celebration in Shirdi ) भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे. सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासुन ते साईंची प्रतीमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली. व्दारकामाईत अखंड पारायणाच वाचन करुन, गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमीत्त साई मंदिराला ( Sai Temple ) आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सव 3 दिवस साजरा केला जातो.
विश्वाला श्रद्धा आणी सबुरीचा मंत्राबरोबरच सबका मालीक एक संदेश देणाऱ्या साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 13 जुलै 1908 साली सुरू झालेल्या शिर्डीतील साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्सवास शंभर वर्षापूर्वीची परंपरा लाभली आहे. योगायोगाने यंदाच्या वर्षी देखील 13 जुलै रोजी आल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे.
115 व्या गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरवात सन 1908 साली सुरु झाली. त्यानंतर आजपर्यंत अनेक भक्त साईबाबांना गुरु मानत त्याचा आशिर्वाद घेण्यासाठी खास करुन गुरुपौर्णिमा ला शिर्डीला येतात. गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पोर्णिमा ही एकच दिवस असते. मात्र, शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव 3 दिवस साजरी करण्याची एक अनोखी परंपरा चालत आली आहे.
गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिर्डीतील साईबाबा मंदीरात काकड आरती झाल्यानंतर साईबाबांची प्रतिमा आणि पोथी, वीणा घेऊन साईमंदिरातून तुतारी, ताशा वाजवत मिरवणुक काढली जाते. या मिरवणुकीूत यावर्षी संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी पोथी, विश्वस्त सचिन कोते व विश्वस्त डॉ. जालिंदर भोर यांनी प्रतीमा तर विश्वस्त सुनिल शेळके यांनी विणा घेवून सहभाग घेतला होता. ही मिरवणुक द्वारकामाईत पोहचल्यानंतर येथे साई चरीत्राच्या अखंड पारायणास सुरवात झाली. हे पारायण उद्या सकाळी संपेल. त्यामुळे द्वारकामाई रात्रभर खुले ठेवण्यात येते.