ETV Bharat / state

शिर्डी-दादर एक्सप्रेस रेल्वे 11 मार्चपासून होणार सुरू - शिर्डी दादर एक्सप्रेस

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आठवड्यातून चार दिवस शिर्डी-दादर एक्सप्रेस रेल्वे बेलापूर, पुणे मार्गे 11 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला.

shirdi
साईनगर रेल्वे स्थानक
author img

By

Published : Feb 20, 2021, 4:23 PM IST

शिर्डी - साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आठवड्यातून चार दिवस शिर्डी-दादर एक्सप्रेस रेल्वे बेलापूर, पुणे मार्गे 11 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने जाहीर केला. जिल्ह्यातील प्रवासी जनतेच्या सोयीची रेल्वे सुरू होत असल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

कशी असणार वेळ

रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारी रात्री 8.10 वाजता साईनगर, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिमा, पुणे मार्गावरून रेल्वे जाणार आहे. श्रीरामपूर येथील बेलापूर स्थानकावर रात्री 9.10 वाजता व अहमदनगर येथे रात्री 10.10 वाजता रेल्वे येणार, तर दादर (मुंबई) येथे पहाटे 6.30 वाजता पोहचणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी नं.01041 दादर, पुणे, साईनगर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल. बेलापूर रेल्वे स्थानकावर 7.40 वाजता तर साईनगर येथे 9.25 वाजता पोहचणार आहे.

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीची ठरणार असलेल्या या रेल्वेचा लाभ घ्यावा, असे आवाहन साईनगर रेल्वे स्थानकचे प्रबंधक एल.पी.सिंग, वाहतूक निरीक्षक पी.के.ठाकूर, वाणिज्य प्रबंधक ए. जे. देशमुख यांनी केले आहे. साईनगर रेल्वे स्थानक प्रबंधक यांनी सदर रेल्वेकरीता प्रवासी संघटना, रेल्वे खात्याकडे पाठपुरावा व 10 हजार सह्यांचे लेखणी केले होते, याची त्यांनी आठवण करुन दिली. या एक्सप्रेसला 1 एसी टू टायर, 1 एसी थ्री टायर, 6 द्वितीय स्लीपर आरक्षण व 4 जनरल बोगी उपलब्ध करण्यात येणार असून मुंबईकडे जाणार्‍या व येणार्‍या शासकीय अधिकारी, पर्यटक, व्यापारी, उद्योजक, राजकिय कार्यकर्ते यांची मोठी सोय झाली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाचे प्रवासी संघटनेच्यावतीने रणजित श्रीगोड, सोलापूर विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य विशाल फोपळे, रेल्वे स्थानक समितीचे सदस्य नगराध्यक्षा अनुराधा आदिक, मंजुश्री मुरकुटे, संजय जोशी, अनिल कुलकर्णी, गोरक्ष बारहाते, बन्सी फेरवाणी यांनी स्वागत केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.