ETV Bharat / state

शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आ. राजळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा प्रयत्न, पोलिसांकडून अटक

शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी आज तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. आंदोलकांकडून आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आमदार मोनिका राजळे व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

author img

By

Published : Nov 11, 2020, 3:29 PM IST

Updated : Nov 11, 2020, 3:39 PM IST

Shevgaon Municipal Council employees strike
शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शेवगाव (अहमदनगर) - शेवगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी आज तिसऱ्या दिवशीही संपावर आहेत. कामगारांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना अलीकडेच मुंडे पुतळ्यासमोर पोलिसांकडून अडविण्यात आले व त्यांना अटक करण्यात आली.

आंदोलकांकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी -

यावेळी आंदोलकांकडूनआमदार मोनिका राजळे व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्यामुळे कामगारांमध्ये मोठा आक्रोश पाहावयास मिळत आहे. तसेच नगर परिषद ही भाजपाच्या ताब्यात असून भाजपा नगरसेवकांमध्ये ताळमेळ नसल्याचेही समोर आले आहे. मुख्य अधिकारी मात्र हताशपणे या सर्व गोष्टींकडे पाहण्यापलिकडे काहीच करत नसल्याचे दिसत आहे.

मुंडे पुतळ्यासमोर पोलीस छावणीचे स्वरुप -
कामगारांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घडविण्यात आल्यानंतर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यासमोर बसून बैठा सत्याग्रह करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना शेवगाव पोलिसांकडून अटक करण्यात आली. यावेळी मुंडे पुतळ्यासमोर पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी अटक करण्यात आलेले वंचित बहुजनचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण, प्यारेलाल भाई शेख, मनसेचे गणेश रांधवणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फटांगडे, प्रवीण फटांगडे, रेश्मा गायकवाड, दत्ता फुंदे इत्यादींना पोलिसांकडून अटक करण्यात आली यावेळी मोठी घोषणाबाजी झाली.

Last Updated : Nov 11, 2020, 3:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.