शिंगणापूर (अहमदनगर) Shanishinganapur Employees On Strike: शनि देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 22 डिसेंबर रोजी सायंकाळी एक बैठक घेऊन लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर देवस्थानच्या वतीने तोडगा काढण्याची मागणी केली. (Indefinite Strike Warning) अन्यथा येत्या 25 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनि शिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी संप केला तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. (Shani Shingnapur Temple )
यामुळे संपावर जाण्याचा निर्णय: शनिशिंगणापूर देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी याआधी 12 सप्टेंबर 2023 रोजी आणि 5 डिसेंबर 2023 रोजी देवस्थान प्रशासनाबरोबर बैठक घेऊन कामगारांच्या समस्यांबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र अद्यापही देवस्थान प्रशासनाने तोडगा न काढल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
मागण्यांवर तोडगा काढण्याची हमी: शनि शिंगणापूर येथील कर्मचाऱ्यांच्या मागण्या फेटाळण्यात आलेल्या नाहीत. युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह चर्चा सुरू आहे. आज शनिवारी पुन्हा कर्मचाऱ्यां बरोबर बैठक होणार आहे. यामध्ये योग्य तोडगा काढला जाईल, असे शनि देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी सांगितले आहे.
शनि शिंगणापूरची महती: देव आहे मात्र मंदिर नाही, वृक्ष असून छाया नाही, घरे आहेत मात्र दरवाजे नाहीत. एवढेच नाही तर येथील बँकेलाही दरवाजे नाहीत, असे आगळे-वेगळ गाव आहे शनि शिंगणापूर.
'हा' आहे देवस्थानचा इतिहास: शनि-शिंगणापूर हे एक आगळे-वेगळे गाव आहे. या गावात पाचशे वर्षांपूर्वी पावसाने गावातील पानसना ओढ्याला महापूर आला होता. या पुरात एक दगडी शिळा वाहून आल्याचा इतिहास आहे. ही शिळा बोराच्या झाडाला अडकलेली असल्याचे स्वप्न एका वृद्धास पडले. या दगडी शिळेला मामा-भाच्याने हात लावला, तेव्हा ती जागेवरून हालते, असे त्याच्या स्वप्नात आले होते. यानंतर गावातील पानस ओढ्यातून ही शिळा काढून जवळच तीची स्थापना करण्यात आली. कालांतराने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करावी या उद्देशाने मंदिर बांधण्यात आले. मात्र, देवाने पुन्हा दृष्टांत देत मंदिर बांधू नये असे सांगितले. त्यामुळे ही शिळा आजही एका दगडी चौथऱ्यावर आहे असा इतिहास येथील नागरिक सांगतात.
'श्री सूर्यपुत्र शनिदेव' हा चित्रपट दाखविण्यात आला: सन (१९९३)साली एका दूरचित्रवाणी वाहिनीवर 'श्री सूर्यपुत्र शनिदेव' हा चित्रपट दाखविण्यात आला होता. त्यानंतर शनि शिंगणापूर हे गाव सगळीकडे नावारुपाला आले. तेव्हापासून या गावाला भेट देण्यासाठी लोकांची ये-जा सुरु झाली. त्या पूर्वीही लोक येथे येत असत. मात्र, त्यांची संख्या कमी होती. सध्या रोजच दर्शनासाठी लोक गर्दी असतात. रोज दहा ते वीस हजार, शनिवारी (८०) हजार ते (१) लाखापर्यंत भाविक येतात. शनिवारी अमावस्या आली तर येथे जत्रा भरते. तर, शनि अमावस्येला सुमारे (८ ते १०) लाख भाविकांची गर्दी होते.
हेही वाचा: