राहुरी (अहमदनगर) - शहरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी येत्या ९ तारखेपासून(गुरुवार) सात दिवस स्वयंस्फूर्तीने शहरात कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्यण घेण्यात आल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.
या संयुक्त बैठकीत मंत्री तनपुरे यांमी सांगितले की, 'शहरातील दूध डेअऱ्या सकाळी व संध्याकाळी एक तास चालू राहतील. मेडिकल दुकाने, दवाखाने २४ तास चालू राहतील. शहरात १२७ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे सर्वांनी एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. गोरगरीब नागरिकांचे हाल होऊ नये. यासाठी शहरात रेशनिंगचे धान्य तत्काळ वाटप करण्याचे ठरले आहे, स्वयंसेवी संस्थांनी गरिबांना धान्य पुरवठा करण्यास पुढाकार घेतला आहे. त्यांना व्यापारी संघटना हातभार लावणार आहेत. शिवाय बालाजी मंदिर येथे कोरोना कोरोना केअर सेंटर पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.' असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-कोरोनाबाबत सरकारला पूर्ण सहकार्य करू, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन
हेही वाचा-मुंबईत पुण्याच्या धर्तीवर निर्बंध लागण्याची शक्यता - महापौर किशोरी पेडणेकर