ETV Bharat / state

Sangamner Prisoners Arrested : कारागृहातून पळून गेलेले ते चारही आरोपी 36 तासात फिल्मी स्टाईलनं जेरबंद - संगमनेर

Sangamner Prisoners Arrested : दोन दिवसांपूर्वी संगमनेर येथील कारागृहातून पळून गेले होते. या चारही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं 36 तासांत अटक केलीय.

Sangamner Prisoners Arrested
Sangamner Prisoners Arrested
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 1:07 PM IST

संगमनेर Sangamner Prisoners Arrested : संगमनेर शहर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सबजेलमधून न्यायालयीन कोठडीत असलेले चार आरोपी कारागृहाचे गज तोडून पळून गेले होते. या चारही आरोपींना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जळगाव जिल्ह्यातील जामनेर शिवारात पकडलंय. तसंच त्यांना वाहनातून पळून जाण्यास मदत करणार्‍या दोघांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अवघ्या 36 तासाच्या आत पोलिसांनी या आरोपींना जेरबंद केलंय.

फिल्मी स्टाईल पाठलाग करुन आरोपी ताब्यात : कारागृहातील गज तोडून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथकं रवाना करण्यात आली होती. त्यातील एक पथक ज्या गाडीतून आरोपी पसार झाले, त्यांचा पाठलाग करत होते. तेव्हा तांत्रिक बाबीतून सदर आरोपी हे धुळे इथल्या एका हॉटेलमध्ये थांबल्याचं समजलं. त्यानंतर दुसरं पथक तिथं धडकलं. मात्र त्यापूर्वीच या आरोपींनी ठिकाण सोडलं होतं. नंतर आरोपी ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्या गाडीचं जीपीएस कट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, दुसरीच वायर कट झाल्यानं त्यांची गाडी बंद पडली. यामुळं आरोपींनी तिथून दुसर्‍या वाहनातून प्रवास सुरू केला. ज्या दिशेनं आरोपी निघाले होते, त्या वाहनाच्या मागावर तिसरं पथक होतं. पुढं जळगाव जिल्ह्यातील जामनेर शिवारात हे आरोपी ओढ्यामध्ये आंघोळ करत असताना त्यांना पालिसांच्या पथकानं पकडलं.

आरोपींकडून साडेदहा लाखांचा ऐवज जप्त : या आरोपींना ताब्यात घेतल्यावर त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 1 गावठी कट्टा, 1 जिवंत काडतूस, 06 मोबाईल फोन, हुंदाई कंपनीची ऑरा गाडी असा एकूण 10 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडं सखोल चौकशी केल्यावर त्यांनी मागील एका महिन्यापासून ब्लेडच्या मदतीनं गज कापण्याचं काम करत असल्याचं सांगितलं. या आरोपींना कारागृहामध्ये गज कापण्यासाठी हत्यारं पुरविणारे तसेच त्यांना पळून जाण्यासाठी मदत करणारे आणि आरोपींना आश्रय देणाऱ्या इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु आसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

गज कापून झाले होते फरार : बुधवारी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संगमनेर उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल उर्फ थापा, आनंद छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव हे चार आरोपी कारागृहातील गज कापून पांढर्‍या रंगाच्या कारमधून अज्ञातासह पसार झाले होते. या घटनेनं पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती.

हेही वाचा :

  1. Four Prisoners Escaped From Prison : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 'फिल्मी स्टाईल'नं चार कैदी कारागृहातून फरार
  2. Mukesh Ambani Threat Case : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्या आरोपीला तेलंगाणातून अटक; आठ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  3. Kerala Blast : केरळ बॉम्बस्फोटातील आरोपीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, केले अनेक खुलासे; जाणून घ्या का केले स्फोट?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.