ETV Bharat / state

चंदन तस्करांना घेतले ताब्यात, 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंदनाची चोरी करून मध्यप्रदेशात घेऊन जाणाऱ्या केरळमधील तस्करांना अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

चंदन तस्करांना घेतले ताब्यात, 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
चंदन तस्करांना घेतले ताब्यात, 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Jun 12, 2021, 6:30 PM IST

अहमदनगर - चंदनाची चोरी करून मध्यप्रदेशात घेऊन जाणाऱ्या केरळमधील तस्करांना अहमदनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये साडेसहाशे किलो चंदन जप्त केले आहे. दरम्यान, चंदनासह 70 लाख रुपयांचा मुद्देमालही यावेळी पोलिसांनी जप्त केला आहे. अब्दुल मोहम्मद निसाद (वय 32 वर्षे रा. अंजामैल हाऊस ता. बैदाडका. जिल्हा कासारगुड, केरळ) आणि अब्दुल फक्रुद्दीन रहमान (वय 41 वर्ष रा. अमितकला हाऊस ता. ऐनमाकजा जिल्हा कासारगुड केरळ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

चंदन तस्करांना घेतले ताब्यात, 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सापळा रचून टाकला छापा

केरळ राज्यातील चंदन तस्कर टोळी राहुरी तालुक्यातील बुऱ्हाणपूर येथून मध्यप्रदेश येथे चोरीचे चंदन घेऊन जाणार असल्याची माहिती, डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी राहुरी कारखाना येथे सापळा रचून छापा टाकला. त्यात अंदाजे 61 लाख रुपये किमतीचे 650 किलो चंदन (प्रति किलो 9500 प्रमाणे) आणि 10 लाखाचे वाहन असा एकूण 71 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एसपी मनोज पाटील, एएसपी डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके, पीएसआय मधुकर शिंदे, पीएसआय निलेश कुमार वाघ, स. फौजदार राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, जानकीराम खेमनर, गणेश फाटक, किशोर जाधव, सुनील दिघे, राहुल नरोडे, होमगार्ड तुषार बोराडे, रमेश मकासरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.