ETV Bharat / state

साखरेच्या भावावर चर्चा केली.. सुजय विखेंच्या भेटीवर रोहित पवारांचे स्पष्टीकरण

माझ्या आजोबांनी या भागात काम केले आहे, त्यामुळे मला या ठिकाणी जावे वाटले असे रोहीत पवार म्हणाले.

author img

By

Published : Feb 20, 2019, 9:27 PM IST

रोहीत पवार

अहमदनगर - शरद पवारांचे नातू रोहित पवार हे अहमदनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे-पाटलांचा मुलगा सुजय यांची भेट घेतली. या भेटीच्या कारणावर तर्क-वितर्क लढवले जात होते. यावर स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले, की दोन युवकांनी भेटण्यात गैर काय आहे. आम्ही सहज भेटलो, भेटून साखरेच्या भावावर चर्चा केली, असे पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, की अहमदनगर येथे माझ्या आजोबाने काम केले आहे. त्यामुळे या जागेविषयी माझ्या मनात जिव्हाळा आहे. त्या ओढीने तिथे गेलो. तेव्हा सुजय यांची भेट झाली. यात राजकीय हेतू नव्हता. आम्ही भेटून साखरेच्या भावावर चर्चा केली, असे पवार म्हणाले.

यावेळी रोहीत पवार यांनी कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, की या भागाचा विकास अजूनही झाला नाही. येथील युवकास रोजगार नाही. पाणी प्रश्न बिकट आहे. औद्योगिक वसाहत, वैद्यकीय सेवा यांचाही प्रश्न आहे. हे चित्र बदलण्यासाठी आपण राजकीय सत्तेतून प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

कर्जत - जामखेड मतदारसंघातून रोहीत पवार निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा होत होती. त्यावर पत्रकारांनी रोहीत यांना प्रश्न विचारला. पण, त्यांनी या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोठारी, मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, डॉ. कैलास हजारे, जुबेर सय्यद, अमित जाधव, अमजद पठाण आदी उपस्थित होते.

undefined

Intro:अहमदनगर- साखर प्रश्न आणि आठवणींना उजाळा : रोहित पवार यांनी सुजय विखे भेटीचा केला खुलासा..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ ahm_ trimukhe_1_rohit_pawar_20_feb_b
mh_ ahm_ trimukhe_2_rohit_pawar_20_feb_v

अहमदनगर- साखर प्रश्न आणि आठवणींना उजाळा : रोहित पवार यांनी सुजय विखे भेटीचा केला खुलासा..

अहमदनगर- कर्जत-जामखेड या संयुक्त असणाऱ्या विधानसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारीस इच्छुक असणारे उमेदवार तथा शरद पवार यांचे नातु रोहीत पवार यांनी जामखेड येथे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्या सोबत बैठक घेऊन चर्चा विनीमय केला. त्यानंतर नगर रोड वरील विश्राम गृहात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आगामी भुमीका स्पष्ट करताना प्रथम जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने रोहित पवार यांच्या समवेत पूलवामा येथे दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पत्रकार परिषदेला सुरवात केली. जामखेड व कर्जत हे दोन्ही तालुके विकासा पासुन वंचीत आहेत तसेच येथील युवक व तरुणास रोजगार नाही पाणी प्रश्न बिकट आहे औद्योगीक वसाहत नाही वैदकीय सेवा उपलब्ध नाही आणी याही पेक्षा हे दोन्ही तालुके सतत दुष्काळाच्या छायेत असल्याने या सर्वाचा विचार करून हे चित्र बदलण्याचा आपण राजकीय सत्तेतुन प्रयत्न करू असे चर्चेतुन स्पष्ट केले. मात्र यावेळी त्यांनी विधानसभेसाठी आपल्या संभाव्य उमेदवरीवर उत्तर देण्याचे टाळले. 

आजोबांच्या आठवणीने घेतली लोणी-प्रवरा भेट :
-सुजय विखेच्या भेटीसंदर्भातील गुढ काय अशा पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण युवक आहोत व तेथे पुर्वी माझ्या आजोबाने काम केले असुन त्या जिव्हाळ्याची आठवण म्हणुन मी गेलो असता त्यांची भेट झाली. यात राजकीय चर्चा किंवा हेतू नव्हता. त्यामुळे कारखान दारीच्या विषयावर आणी आजोबा याच्या जुन्या आठवणी संदर्भातील असणारी ओढ एवढच ते काय असे सांगताना आणी युवकाने युवकांशी भेटणे यात गैर ते काय तेथे सुजय विखे भेटले आणि साखर भाव यावर चर्चा झाली असल्याची त्यानी सांगीतले. 
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राजे द्र कोठारी मधुकर राळे भात,दत्तातत्रय वारे, नगरसेवक दिगंबर चव्हाण पवन राळे भात डॉ कैलास हजारे जुबेर भाई सय्यद आमित जाधव अमजद पठाण सह अनेक मान्यवर व. राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

- राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- साखर प्रश्न आणि आठवणींना उजाळा : रोहित पवार यांनी सुजय विखे भेटीचा केला खुलासा..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.