ETV Bharat / state

Robbers Gang Arrested : शेतवस्तीवर जबरी चोरी करणाऱ्या लुटारुंच्या टोळीला अटक; पावणे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Ahmednagar Crime

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर, नगर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतवस्तीवर मारहाण करत जबरी चोऱ्या (Forcible theft by assault) करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले (robbers gang arrested in Ahmednagar) आहे. या टोळीकडून चोरलेले सोने आणि एक चारचाकी वाहन असा नऊ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त (Assets worth ten lakhs seized) करण्यात आले आहे. latest news from Ahmednagar, Ahmednagar Crime

Robbers Gang Arrested
लुटारुंच्या टोळीला अटक
author img

By

Published : Nov 13, 2022, 5:34 PM IST

अहमदनगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर, नगर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतवस्तीवर मारहाण करत जबरी चोऱ्या (Forcible theft by assault) करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले (robbers gang arrested in Ahmednagar) आहे. या टोळीकडून चोरलेले सोने आणि एक चारचाकी वाहन असा नऊ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त (Assets worth ten lakhs seized) करण्यात आले आहे. latest news from Ahmednagar, Ahmednagar Crime

टोळीचा श्रीरामपूर, नगर तालुक्यात धुमाकूळ : श्रीरामपुर तालुक्यात निखील बाळासाहेब वाघवय (वय 22, रा. वाघवस्ती, चारी क्र.11, कारेगांव, ता. श्रीरामपूर) यांच्या घरी रात्रीच्या सुमारास चार आरोपींनी घराचा दरवाजाची कडीकोंडा कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला आणि चाकूचा धाक दाखवुन लाथाबुक्यांनी मारहाण व जखमी करुन घरातील २ लाख ७१ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. इतर एक ठिकाणीही चोरट्यांनी दहा हजारांची लूट केली होती. याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुध्द जबरी चोरी, घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोने विकायला आले आणि जेरबंद झाले : दाखल गुन्ह्याबाबत श्रीरामपूर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण शाखेने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास केला. गुन्हे शाखेच्या मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नेवासे तालुक्यातील खडके फाटा इथे तवेरा चारचाकी वाहनातून आलेल्या टोळीतील तीन आरोपीना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. आरोपींनी श्रीरामपूर, नगर तालुक्यात जबरी चोरी केल्याचे कबूल करत या चोरीतील सोने विकण्यासाठी नगरकडे येत असल्याची कबुली दिली आहे.

या पथकाने केला तपास: जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नी.अनिल कटके तसेच तपास पथकातील सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे, पोसई विठ्ठल पवार, पोसई संदीप ढाकणे, पोसई विजय भोंबे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ विनोद मासाळकर, जालिंदर माने, सागर ससाणे आदींच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास लावत आरोपीना जेरबंद केले.

हे आहेत आरोपी: 1) आर्यन ऊर्फ एरीयल ऊर्फ काळु कांतीलाल काळे, वय 26, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद, 2) विदेश नागदा भोसले, वय 19, रा. नवापुरवाडी, ता. गंगापुर, जिल्हा औरंगाबाद व 3) भोईट्या ऊर्फ डसल्या ऊर्फ आदित्य कांतीलाल काळे, वय 21, रा. मानगल्ली, नेवासा फाटा, ता. नेवासा असे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.