ETV Bharat / state

शेवगावमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी नागरिकांचा रास्ता रोको - vanchit bahujan aghadi

शेवगाव येथील वार्ड क्रमांक २१ मध्ये नळातून मलमूत्रयुक्त पाणी येणे, रस्त्यावर गटारीतील पाणी साचून राहत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नोव्हेंबर महिन्यात वार्डातील नागरिकांनी नगरपरिषदेला निवेदन दिले होते. मात्र, नगरपरिषद व वार्डातील नगरसेवकाने याकडे काणाडोळा केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रविवारी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

ahmednagar
शेवगावमध्ये नागरिकांचे रास्ता रोको
author img

By

Published : Dec 30, 2019, 8:07 AM IST

अहमदनगर - वंचित बहुजन आघाडी व वार्ड क्रमांक २१ मधील रहिवाशांनी शेवगाव येथील रेसीडेंशियल हायस्कूल मिरी रोडवर रास्ता रोको केला. वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

शेवगावमध्ये नागरिकांचा रास्ता रोको

मलमूत्रयुक्त पाणी नळाद्वारे येणे तसेच गटारीतील पाणी रस्त्यावर साचल्याने वार्ड क्रमांक २१ मधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ९ नोव्हेंबरला वंचित बहुजन आघाडी व वार्ड क्रमांक २१ मधील रहिवाशांनी शेवगाव नगरपरिषदेला निवेदन दिले होते. परंतु, नगरपरिषद आणि या वार्डातील नगरसेवकाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांच्यावतीने येथे रास्ता रोको करण्यात आले.

या रस्ता रोको आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे शेख प्यारेलाल भाई, लखन घोडेराव, अ‌ॅड गलांडे, पप्पू गर्जे, रावसाहेब जाधव, प्रसाद पहिलवान, संदिप गवळी, विनोद सावंत, राजूभाई शेख आदींसोबतच वार्ड क्रमांक २१मधील इतर रहिवासी मोठ्या प्रमाणात हजर होते. रास्ता रोको केल्याने शेवगाव नगर परिषद सीईओ गरकळ, नगराध्यक्ष विनोद मोहिते, अशोक आहुजा, वार्ड क्रमांक २१ चे नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे तातडीने आले व कामास जलदगतीने सुरुवात केली. यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबविण्यात आले.

हेही वाचा - जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांची मंत्री पदी वर्णी लागणार ?

यावेळी किसन चव्हाण यांचे वार्ड क्रमांक २१ मधील नागरिकांनी आभार मानले. विशेष म्हणजे, प्रा. चव्हाण हे मुंबई (दादर) येथील एनआरसी कायदा विरोधातील आंदोलन करून आले होते. यानंतर शहरातील व तालुक्यातील कोणत्याही प्रश्नासंदर्भात वंचित बहुजन आघाडी शेवगावतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - बालमटाकळीत एकाच रात्रीत चार घरफोड्या; दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

Intro:शेवगाव मध्ये नागरिकांचे रास्ता रोकोBody:शेवगाव येथील वार्ड क्रमांक २१ मध्ये रेसीडेंसील हायस्कुल मिरी रोडवर वंचित बहूजन आघाड़ी व वार्ड क्रमांक २१मधील रहीवांशीनी वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा किसन चव्हाणसर यांच्या नेततृत्वा खाली ""रस्ता रोको""आंदोलन करण्यात आले
मलमुत्र युक्त पाणी,नळाद्वारे येणे,तसेच,रस्त्यावर येणे,यामुळे वार्ड क्रमांक २१मधील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला दि,९/११/२०१९ रोजी वंचित बहूजन आघाड़ी व वार्ड क्रमांक २१मधील रहीवाश्यांनी शेवगाव नगरपरिषदेला निवेदन दिले होते परंतु नगरपरिषद ने व या वार्डातील नगरसेवकांने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे रस्तारोको करण्यात आले
या रस्ता रोको आंदोलना मध्ये वंचित बहूजन आघाड़ीचे शेख़ प्यारेलाल भाई,लखन घोडेराव,ॲड गलांडे,,पप्पू गर्जे,रावसाहेब जाधव,प्रसाद पहीलवान,संदिप गवळी,विनोद सांवत, राजूभाई शेख,कीरण सांवत,मयंक गर्जे,सार्थक गर्जे,कृष्णा सांवत, रूद्र गपाट, डॉ बुचकुल, डॉ आवारे,श्रीभुषण काटे,तसेच महीला भगीणी सिताबाई पहीलवान,सिमा आधाट,वत्सलाबाई गर्जे,परविनभाभी, सुनिता मुरदारे,नवगिरेबाई,रेहानाआपा,शाबेराआपा,व ईतर वार्ड क्रमांक २१मधील रहीवाशी मोठ्या प्रमाणात हजर होते रस्तारोको केल्याने शेवगाव नगर परिषद सिओ गरकळ, नगर अध्यक्ष विनोद मोहीते, अशोक आहुजा, वार्ड क्रमांक २१चे नगर सेवक भाऊसाहेब कोल्हे,तातडीने आले व कामास जलदगतीने सुरवात केली
या मुळे रस्तारोको आंदोलन थांबवण्यात आले
प्रा किसन चव्हाणसर यांचे वार्ड क्रमांक २१मधिल नागरिक व ग्रामस्थांनी मनपुर्वक आभार मानले विशेष म्हणजे प्रा किसन चव्हाणसर हे मुंबई (दादर)येथील NRC कायदा विरोधातील
आंदोलन करून आले होते प्रा किसन चव्हाणसर हे म्हणाले या नंतर शेवगाव शहरातील व तालुक्यातील कोणत्याही प्रश्ना संदर्भात वंचित बहूजन आघाड़ी शेवगाव तर्फै आंदोलन करण्यात येईल.Conclusion:शेवगाव मध्ये नागरिकांचे रास्ता रोको
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.