ETV Bharat / state

MNS Organise Iftar Party : 'भोंग्या'मुळे तापलेल्या वातावरणात शिर्डीत मनसेची इफ्तार पार्टी

author img

By

Published : Apr 30, 2022, 6:21 PM IST

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना ( Ramzan Eid 2022 ) सध्या सुरु आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांना शिर्डीतील मनसेचे नेते दत्तात्रय कोते यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन ( MNS Organise Iftar Party ) केले.

MNS Organise Iftar Party
MNS Organise Iftar Party

शिर्डी - मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना ( Ramzan Eid 2022 ) सध्या सुरु आहे. त्यानिमित्त मुस्लिम बांधवांना शिर्डीतील मनसेचे नेते दत्तात्रय कोते यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले. शिर्डीच्या साईबाबांचा सबका मालिक एकचा संदेश त्यांनी जपला आहे. कोतेंनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित ( MNS Organise Iftar Party ) होते.

एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ( Loudspeaker Controversy ) राज्यात चांगलेच रान उठविले आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध मुस्लिम असे वातावरण तयार झाले आहे. मात्र, सबका मालिक एकचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत मनसेने रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीला शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, सलीम शेख, गणीभाई पठाण, बाबाभाई सय्यद, शफीक शेख आदींसह हिंदू-मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोतेंनी साईबाबांच्या पावनभूमीतून छान संदेश दिला असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.

मनसेचे नेते कोते आणि ग्रामस्थ संवाद साधताना

सध्या मनसे विरुद्ध धार्मिक स्थळावरील भोंगे असे वातावरण तापलेले आहे. ‘भोंग्या’मुळे असे हे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे सामाजिक सलोखा राखण्याचे कामही मनसेचे जिल्हा स्तरावरील नेते करताना दिसून येत आहे. आपल्या सामाजिक कार्यामुळे ओळखले जाणाऱ्या दत्तात्रय कोतेंनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची चर्चा होत आहे. दुसरीकडे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंना इफ्तार पार्टीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्या निमंत्रणाची चर्चा रंगलेली असतानाच शिर्डीत मनसेने दिलेल्या इफ्तार पार्टीचीही चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - Bhaskar Jadhav On Raj Thackeray : अयोध्येत जाऊन राज ठाकरे योगींच्या टकल्याला शाई लावणारेत का? शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचा राज ठाकरेंना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.