ETV Bharat / state

शरद पवारांनी सिंचन घोटाळ्यातील 'साक्षीदार' फोडला... खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर राम शिंदेंची आगपाखड! - माजी मंत्री राम शिंदे न्यूज

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असे भाजपचे नेते राम शिंदे यांनी म्हटले. खडसेंना केवळ राष्ट्रवादीत पश्चाताप मिळेल, असा दावा शिंदे यांनी केला आहे

राम शिंदे
राम शिंदे
author img

By

Published : Oct 24, 2020, 1:32 PM IST

Updated : Oct 24, 2020, 1:41 PM IST

अहमदनगर- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी खडसे यांना पक्षात प्रवेश देत सत्तर हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्यातील मुख्य साक्षीदार फोडल्याची टीका शिंदे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असे भाजपचे नेते राम शिंदे यांनी म्हटले. खडसेंना केवळ राष्ट्रवादीत पश्चाताप मिळेल, असा दावा शिंदे यांनी केला आहे. खडसे यांच्याकडे सिंचन घोटाळ्यातील गाडीभर पुरावे होते. मात्र, जलसिंचन घोटाळ्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने फरक पडणार नाही, असेही माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

शरद पवारांनी सिंचन घोटाळ्यातील 'साक्षीदार' फोडला

भाजप नेते राम शिंदे यांची आमदार रोहित पवार यांच्यावर टीका

साधारणत: वर्षभरापूर्वी विधानसभेचे निकाल लागले. राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदार संघात भाजपचे मतदारसंघातील तत्कालीन विद्यमान आमदार, राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांना शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी पराभवाची धोबीपछाड दिली होती. या पराभवाला आज वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त आमदार रोहित पवार यांनी एका वर्षात काय काम केले, याचा उहापोह राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत घेतला. बारामती पॅटर्न फेल गेल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. 'नवे पर्व, फेल सर्व' असे शिंदे यावेळी म्हणाले. वर्षभरात कामे झाली नाहीत. पूर्वीच्याच कामांचे फक्त नारळ फोडण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केल्याचा दावा शिंदे यांनी केला.

पंचवीस वर्षे भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघात एक वर्षात दुर्दशा!

नगर जिल्ह्यात नेहमीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ पूर्वी राखीव असताना भाजपचे सदाशिव लोखंडे यांच्याकडे आणि खुला झाल्यानंतर राम शिंदे यांच्या ताब्यात राहिला आहे. गेली 25 वर्षे भाजपने प्रतिनिधित्व केल्यानंतर 2019 ला शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी नियोजनबद्ध काम करत कर्जत आणि जामखेड तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष केंद्रित करत निवडणूक लढवली. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला होता.

आमदार गोपीचंद पडळकर यांना रोहित पवारांनी लगावला होता टोला-

मध्यंतरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिराजगाव येथील नगर-सोलापूर महामार्गाच्या दुरावस्थेवर व्हिडीओ चित्रित करून मतदारसंघात कामे होत नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आमदार रोहित यांनी गेली 25 वर्षे हा मतदारसंघ तुमच्याकडे असल्यानेच हे चित्र असल्याचे प्रत्युत्तर दिले होते. मला आमदार होऊन एक वर्षे झाले आहे. कोरोनाच्या काळात आम्ही काम करत आहोत. मात्र बरे झाले, पडळकरांनीच या मतदारसंघची पोलखोल केली, असा टोला आमदार पवारांनी लगावला होता. त्यामुळे राम शिंदेंनी पराभवाच्या केलेल्या आरोपांवर आमदार रोहित पवार काय उत्तर देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Oct 24, 2020, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.