शिर्डी - रक्षाबंधनानिमित्त ( raksha bandhan ) शिर्डीतही साईबाबांच्या मूर्तीला मंदीर पुजाऱ्यांच्या हस्ते राखी बांधण्यात आली. श्रावण महीन्यापासून निसर्गाच्या कृपेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहते. अनेक साईभक्तांनी आज साईबाबांच्या मंदीरात दर्शनासाठी हजेरी लावली ( Raksha Bandhan Celebration In Shirdi ).
मुंबईच्या साईभक्तांची राखी साईच्या शिर्डीत तसे सगळेच उत्सव साजरे केले जातात ( Shirdi Sai Temple ). आज पहाटेच्या काकड आरती नंतर बांबाना मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साई मुर्तीला भरजरी वस्र नेसवण्यात आले. त्यानंतर मुंबईच्या एका साईभक्ताने ( Saibaba devotee )आणलेली सुंदरशी मोठी राखी बांबांच्या संगमरवरी मूर्तीच्या हातात साई मंदीर पुजाऱ्यांच्या हस्ते बांधण्यात आली. त्यानंतर दुपारच्या मध्यान्ह आरतीनंतरही आणखी दुसरी राखी बांधण्यात आली आहे. साईरूपी भावाचा निराळ्या मायेचा झरा, कायम असाच भरलेला वहात राहो हीच प्रार्थना अनेक भक्तांनी साई चरणी केली आहे ( Saibaba Darshan ).
रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधतात शिर्डीत साईबाबा होते तेव्हा शिर्डीतील महिला बाबांना रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधायच्या. आज ही परंपरा साई संस्थान आणि भाविकांकडून सुरू आहे. दरवर्षी भाविक रक्षाबंधनच्या दिवशी बाबांना राखी घेऊन येत असतात. या ही वर्षी मुंबई येथील भाविकांनी बाबांना अतिशे सुंदर राखी आणली आहे. आज सकाळी बाबांना राखी बांधल्या नंतर शिर्डीतील पंचकृषित रक्षाबंधन सणाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा Achievements In Sports क्रीडा क्षेत्रात भारत देशाची प्रतिमा उंचावलेल्या भारतीय महिला