अहमदनगर - बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या बाहेर कधी काम केले नाही. त्यांना काँग्रेस पक्षाचे नेतृत्व अपघाताने मिळाल्याने त्यांना मंत्रिमंडळात अपेक्षित पद मिळाले आहे. पण, ज्यांनी काँग्रेस वाढीसाठी काम केले त्यांना डावलण्यात येत असल्याचे भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
काँग्रेससाठी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले. दिग्गज नेत्यांना अपेक्षित मंत्रिपदही दिले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - पोलीस स्थापना दिन सप्ताहानिमित्त अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपक्रम