ETV Bharat / state

एक लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षक रंगेहाथ पकडले, पोलीस वर्तूळात खळबळ - अहमदनगर लेटेस्ट न्यूज

चोरीचा माल घेतल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी, नाशिकमधील सराफाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेरमधील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना पकडण्यात आले. ही कारवाई नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

psi arrested for allegedly taking rs 1 lakh bribe in sangamner ahmednagar
एक लाखाची लाच घेताना पीएसआयलाला रंगेहाथ पकडले, पोलीस वर्तूळात खळबळ
author img

By

Published : Nov 4, 2020, 8:04 AM IST

अहमदनगर - चोरीचा माल घेतल्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी, नाशिकमधील सराफाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना संगमनेरमधील पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना पकडण्यात आले. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संगमनेर पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचत ही कारवाई केली.

काय आहे प्रकरण -
संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील विद्युत कॉलनीमध्ये घरफोडी झाली होती. यात सुमारे सव्वातीन लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या चोरीत आरोपीने आपले आई-वडील नाशिक येथे दवाखान्यात असल्याने स्वतःच्याच घरात चोरी केली होती. या चोरीत लांबविलेले दागिने आरोपीने नाशिक येथील मित्राच्या मदतीने सोनाराला विकले होते. त्यानंतर आरोपी फरार होते. पोलिसांनी तपास केला. यामध्ये दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली.

सोनाराकडे पैशाचा तगादा

आरोपींकडून सोने कुठे विकले, याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांनी घेत त्या सोनारांकडे पैसाचा तगादा लावला. परदेशी यांच्या तगाद्याला कंटाळून सोनाराने अखेर नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या पथकाने संगमनेरात सापळा रचला आणि एक लाखाची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी यांना रंगेहात पकडले. दरम्यान, या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - काँग्रेसचे अहमदनगर सरचिटणीस श्रीकांत मापारी यांच्यावर भ्याड हल्ला; मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा - गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या केली; तीन वर्षांची मुलगीही मृतावस्थेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.