शिर्डी (अहमदनगर)- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊननंतर शहरी भागातून गावांकडे नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुणे-मुंबई या शहरात रोजगार राहिलेला नाही, म्हणून मजूर आणि कामगार वर्ग पायी चालत आप-आपल्या गावी परतत आहे.
मात्र आज सकाळपासून पुणे-नाशिक महामार्गावरील अहमदनगरच्या सीमेवर या मजुरांना प्रशासनाने थांबवले आहे. या मजुरांची संख्या ३०० ते ४०० असून आता प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.