ETV Bharat / state

साई मंदिर परिसरात साईभक्तांचे पाकीटमार करणाऱ्या सात महिलांना पोलीसांनी घेतले ताब्यात - साई मंदिर परिसरात साईभक्तांचे पाकीटमार

साई मंदिर परिसरात साईभक्तांचे पाकीटमार करणाऱ्या सात महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले. या महिलांना महिलांना साईबाबा संस्थांच्या सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे.

Police have arrested seven women for pocketing Sai devotees in the Sai Mandir area
साई मंदिर परिसरात साईभक्तांचे पाकीटमार करणाऱ्या सात महिलांना पोलीसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Mar 5, 2021, 4:25 PM IST

अहमदनगर - साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालय परिसरात पाकीट मारण्याच्या उद्देशाने फिरत असलेल्या महिलांना साईबाबा संस्थांच्या सुरक्षारक्षकांनी मोठ्या शिताफीने पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोन्ही महिला श्रीरामपूर येथील रहीवासी असून त्यांचे वय 30 ते 40 आहे.

श्रीरामपूर शहरातील काही महिला शिर्डीत येऊन साई भक्तांचे पर्स चिजवस्तु चोरी करण्यासाठी कधी बसस्थानक कधी साईबाबा मंदिर परिसर तर काही वेळा प्रसाद भोजनालय परीसरात फिरताना आढळून येतात. अनेक वेळा गुन्हा करुन पसार देखील होतात. एक महिन्या अगोदर अशाच संशयित महिलांनी मुंबई येथील साईभक्त महिलांची पर्स चोरी केली होती, त्याचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी साईबाबा संस्थान सुरक्षा रक्षकांना कडक कारवाई बाबत सुचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदीर सुरक्षा रक्षक नाना हासे, समाधान बनकर यांच्या पथकाने या महिलांना पकडून शिर्डी पोलीसांच्या ताब्यात दिले असून या पुढील काळात चोरीचे प्रकार रोखण्यासाठी साईबाबा संस्थांने पुढाकार घेतला आहे.

साई संस्थांच्या सुरक्षारक्षकांनी सात महिलाना पकडुन शिर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून या संबंधित महिलांवर कठोर कारवाई झाली तर शिर्डी परीसरात भाविकांनच्या चोरीला आळा बसेल, अशा ग्रामस्थांच्या भावना आहे. यात वयोवृद्ध महिला देखील असल्याचे दिसून आले आहे. या सर्व महिला श्रीरामपूर शहरातील वॉड क्रमांक दोन मधील आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.