शेवगाव (अहमदनगर) - शहरात रविवारी (दि. 6 डिसें.) सकाळी क्रांती चौकामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी व भाजपच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. पंजाबमधील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याला विरोध केल्यानंतर त्या आंदोलनात आतापर्यंत तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचाही यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना सुभाष पाटील लांडे म्हणाले की, केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी असून त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. देशभरातील शेकडो शेतकरी संघटना व लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीची नाकाबंदी केली. कृषी विरोधी तीनही कोयदे मागे केद्र सरकार मागे घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई करून सोडून दिले.
हेही वाचा - पाथर्डी तालुक्यात तिसरा बिबट्या जेरबंद; नागरिकांमध्ये दहशत कायम