अहमदनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. देशात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर मधील परस्थिती पाहिल्यावर विश्वस्त मंडळाने आमि देवस्थान प्रशासनाने मंदिर परिसर राम भरोसे कोडला की काय अशी परस्थिती आहे. या ठिकाणी ई टीव्ही भारत प्रतिनिधीने भेट दिली असता माहिती देण्यास संस्थांच्या वतीने कोणीही उपलब्ध नव्हते.वास्तविक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने विश्वस्त आणि देवस्थान प्रशासनाने मंदिर परिसरात लक्ष ठेवून नियमांचे पालन होते की नाही हे पाहिले पाहिजे. सर्व परिसरात देवस्थानचे सुरक्षारक्षक दिसून आले ते भक्तांना मास्क वापरण्याचे आवाहन करत होते. त्याचबरोबर बहुतांशी भक्त पण मास्क लावून मंदिर परिसरात दिसून आले. मात्र, मंदिर प्रवेशद्वारावर देवस्थानने सॅनिटरायजेशनची व्यवस्था केली आहे, ना भक्त शनि मूर्तीसमोर फिजिकल डिस्टन्स भक्त पाळत आहेत. मात्र, याबाबत देवस्थान कडून कसल्याही सूचना भक्तांना देण्याची तसदी घेतली जात नसल्याचे दिसून आले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आपणच आपली काळजी घेतली पाहिजे असेही काही भक्तांनी सांगितले.
पदाधिकारी-मंडरी प्रशासन अदृश्य -
शनिशिंगणापूर देवस्थानचे नुकतेच नवीन विश्वस्त मंडळ स्थापन झाले आहे. विश्वस्थ मंडळाचे मोजके पदाधिकारी मंदिरात येत असतात. मात्र, काही वेळ थांबून ते निघून जातात, त्यामुळे कोणी राजकीय नेता, सेलिब्रिटी असल्याशिवाय विश्वस्थ मंडळ पदाधिकाऱ्यांनचे दर्शन मंदिर परिसरात होत नाही. देवस्थांवर प्रशासकीय अधिकारी पण नियुक्त असून आज त्या सर्वांची अनुपस्थिती दिसली, त्यामुळे देशात प्रसिध्द असलेले हे देवस्थान केवळ सुरक्षा रक्षकांच्या भरवशावर असल्याचे दिसून आले.