नेवासा (अहमदनगर) - तालुक्यातील चांदा येथील कर्डिले वस्तीवर चोरट्यांनी केलेल्या जबर मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ( One Dead in Attack by Theives ) ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. ओंकार कर्डिले असा 22 वर्षीय मृत युवकाचे नाव आहे. तर या घटनेत इतर दोन जखमी झाले आहेत. या घटनेने चांदा परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
नेवासा तालुक्यातील चांदा गावांमध्ये काल रात्री साडेबारा-एकच्या सुमारास दोन चोरट्यांनी कर्डिले वस्तीवर बापूसाहेब कर्डिले यांच्या घरावर चोरीच्या उद्देशाने प्रयत्न केला. यावेळी कर्डिले कुटुंबातील सदस्यांनी या चोरांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एका चोरट्याने आपल्या जवळील चाकूचे सपासप वार कर्डिले कुटुंबातील सदस्यांवर केले. यात ओंकार कर्डिले वय 22 त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर बापू भाऊसाहेब कर्डिले आणि गंगाधर बाळा कर्डिले हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आहेत. तर ओंकार कर्डिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा - Nana Patole Comment On BJP : राज्यपालांची हकालपट्टी करा - नाना पटोले
घटनेची माहिती मिळताच, नेवासा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी डिटेक्ट झाल्याची माहिती आहे. या आरोपींनी चांदा गावाजवळच लोहारवाडी इथेही अगोदर चोरी केली होती.