ETV Bharat / state

दुचाकी आणि कंटेनरचा शिर्डीत भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

शासकीय विश्रामगृहासमोर नगर-मनमाड महामार्गावर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार राजू मधूकर भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Nov 5, 2020, 3:47 PM IST

shirdi nagar-manmad accident one died
शिर्डी अपघातात एकाचा मृत्यु

शिर्डी (अहमदनगर ) - शासकीय विश्रामगृहासमोर नगर-मनमाड महामार्गावर दुचाकी आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार राजू मधूकर भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत भालेराव हे चारी शिर्डी इथले रहिवासी होते. दरम्यान कंटेनर चालक संजेश हा पळून जात असताना त्याला काही युवकांनी पाठलाग करून पकडले. युवकांनी निमगाव बायपास चौफुलीवर पकडून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.

शिर्डी अपघातात एकाचा मृत्यु
नगर-मनमाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. जड वाहतूकदेखील याच रस्त्यावरून होत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्याची मलमपट्टी केली जात आहे. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह याठिकाणी मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला उडवले. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच खाजगी रुग्णवाहिकेतून दुचाकीस्वाराचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.