ETV Bharat / state

कौतुकास्पद..! दोन आजी-माजी राजपत्रित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस दिली मदत

इंजि. मनोहर पोकळे यांनी त्यांचे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण सेवानिवृत्ती वेतन जे ४८ हजार २१६ रुपये एवढे आहे ते अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांच्याकडे जमा केले आहे. तसेच, अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांनी ५१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे जमा केला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील उपस्थित होत्या.

cm relief fund mumbai
मुख्यमंत्री मदत निधीस मदत देतेना राजपत्रित अधिकारी
author img

By

Published : Apr 5, 2020, 8:31 PM IST

अहमदनगर- कोरोना विषाणूच्या निर्मुलनासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीला अनेक हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे माजी अध्यक्ष मनोहर पोकळे आणि नगरचे अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत निधी दिला आहे.

मनोहर पोकळे यांनी त्यांचे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण सेवानिवृत्ती वेतन, ४८ हजार २१६ रुपये अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांच्याकडे जमा केले आहे. यावेळी राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे राज्य संघटक विठ्ठलराव गुंजाळ आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच, अपर जिल्हाधिकारी सोरमारे यांनी ५१ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे जमा केला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) उर्मिला पाटील उपस्थित होत्या.

हेही वाचा- कोरोना इफेक्ट.. शेतकऱ्याने १० हजार झेंडूची झाडे उखडून फेकली !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.