ETV Bharat / state

साईबाबा पुण्यतिथी उत्सव : विद्युत रोषणाईने मंदिर अन् परिसर उजळला - साईबाबा बातमी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने यंदाचा वर्षी साईबाबाचा 103 वा पुण्यतिथी उसत्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. साईबाबांचा पुण्यतिथी उत्सवा निमित्ताने शिर्डी ग्रामस्थ सुनील बारहाते यांनी आपल्या स्वखर्चाने साई समाधी मंदिराला तसेच मंदिर परिसरातील सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई केली आहे. यामुळे साईमंदिर आणि परिसर उजळून निघाला आहे.

z
z
author img

By

Published : Oct 14, 2021, 12:26 PM IST

अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने यंदाचा वर्षी साईबाबाचा 103 वा पुण्यतिथी उसत्व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. साईबाबांचा पुण्यतिथी उत्सवा निमित्ताने शिर्डी ग्रामस्थ सुनील बारहाते यांनी आपल्या स्वखर्चाने साई समाधी मंदिराला तसेच मंदिर परिसरातील सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई केली असल्याने साईमंदिर आणि परिसर उजळून निघाला आहे.

बोलताना सुनिल बारहाते

शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या साईबाबा पुण्यतिथी उत्सवा निमित्त एका साईभक्त परिवाराने आपल्या स्वखर्चाने साईबाबा समाधी मंदिरात तसेच मंदिर परिसरातील व्दारकामाई मंदिर, चावडी मंदिर तसेच अन्य मंदिरांना फुलांची सजावट केली आहे. त्याच बरोबर शिर्डीतील ग्रामस्थ सुनिल बारहाते यांनी साई मंदिराला तसेच मंदिर परिसरातील व्दारकामाई मंदिर, चावडी मंदिर तसेच अन्य मंदिरांना विद्युत रोषणाई केल्याने साईमंदिर आणि परिसर उजळून निघाला आहे.

गेल्या वर्षीही शिर्डी ग्रामस्थ सुनील बारहाते यांनी साई संस्थानकडून कोणाताही मोबदला न घेता रामनवमी उत्सवावेळी तसेच गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने गुरुदक्षिणा म्हणून साईमंदिर आणि परिसराला रोषणाई केली होती. यावेळी साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त बरहाते यांनी साईमंदिर तसेच परिसरातील सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई केली आहे. या विद्युत रोषणाईचे खास वैशिष्ठ म्हणजे, साईबाबांचा सबका मालिक एक हा महामंत्र, त्याच बरोबर ओम साई राम हे शब्द साई मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमध्ये साकरण्यात आले आहे. तसेच साईबाबांच्या द्वारकामाई मंदिराला आणि चावडी मंदिराला झुंबर लावण्यात आले आहे.

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने 7 ऑक्‍टोबरपासून पहाटेच्‍या काकड आरतीनंतर साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळत दिवसभरात सुमारे 11 हजार भाविकांना सामाजिक अंतराचे पालन करुन भाविकांना मंदिरात साई दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेत येत असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा - शिर्डी : 'असा' होणार साईबाबांचा 103 वा पुण्यतिथी उत्सव साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.