ETV Bharat / state

नाताळ व नवीन वर्षानिमित्त पदयात्रींनी शिर्डीला पालख्या आणू नये; कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर साई संस्थानचे आवाहन

शिर्डीच्या साईबाबांचे जगभरात कोट्यवधी भक्त आहेत. दरवर्षी नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत अशी संधी साधून भाविक शिर्डीला येतात. मात्र, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे भाविकांनी शिर्डीमध्ये जास्त गर्दी करू नये, असे आवाहन संस्थानच्यावतीने केले जात आहे.

author img

By

Published : Dec 11, 2020, 1:04 PM IST

Sai Baba
साई बाबा

अहमदनगर - नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्‍त शिर्डीत गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्‍तांनी आपली गैरसोय टाळण्‍यासाठी ऑनलाईन दर्शन पास घेवूनच शिर्डीला यावे. तसेच दरवर्षी नियमित पालखी घेऊन येणा-या पदयात्रींनी यावर्षी पालखी आणू नये, असे आवाहन शिर्डी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले.

भाविकांनी पालख्या आणू नये -

साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी नाताळ सुट्टी व नवीन वर्षाच्या स्‍वागतासाठी शिर्डीला येवून साई समाधीचे दर्शन घेतात. याचवेळी महाराष्‍ट्रासह इतर राज्‍यांतून शेकडो पालख्‍यांसह पदयात्री शिर्डीत हजेरी लावतात. परंतु यावर्षी संपुर्ण जगभरात कोरोना संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍यावतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. १७ मार्च पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे यावर्षी संस्‍थानच्‍यावतीने साजरे करण्‍यात येणारे रामनवमी, गुरुपौर्णिमा व पुण्‍यतिथी आदी उत्‍सव अतिशय साध्‍या पध्‍दतीने व भाविकांविना साजरे करण्‍यात आले. त्याप्रमाणेच नवीन वर्षाच्या स्वागतावेळीही भाविकांनी पालख्या आणू नये, असे आवाहन संस्‍थानने केले आहे.

ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीत यावे -

सध्या राज्‍य शासनाच्‍या आदेशानुसार १६ नोव्‍हेंबरपासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी व शर्तींसह खुले करण्‍यात आले आहे. अद्याप कोरोनाचे संकट संपलेले नाही. त्यामुळे सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. संस्‍थानच्‍यावतीने विविध उपाययोजनाही करण्‍यात आल्‍या आहेत. मात्र, तरीही नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्‍त २५ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१ याकालावधीत साईंच्या दर्शनासाठी येताना संस्‍थानच्‍या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरून ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. अधिक माहितीसाठी संस्‍थानच्‍या www.sai.org.in या संकेतस्‍थळावर संपर्क करण्याचे, आहवान साई संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले.

'या' नियमांचे करावे पालन -

कोरोना विषाणूच्‍या पार्दुभावामुळे साईंच्या दर्शनासाठी ठराविक संख्‍येनेच भक्तानां मंदिरात प्रवेश दिला जात असल्‍यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे. अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. तसेच मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना, १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुले, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये, अशा सूचना कान्‍हूराज बगाटे यांनी दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.