अहमदनगर - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल हा ( Supreme Court OBC Judgment ) ओबीसी समाजासह आम्हा सर्वांसाठी आनंद देणारा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणा बाबत प्रक्रिया क्रिया देताना आमदार थोरात म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने बांठिया समितीची स्थापना केली होती. या समाजाला आरक्षण मिळावे याकरता सरकारने सातत्याने पाठपुरावा केला. सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल मंजूर केला असून 27 टक्के आरक्षण मिळाले आहे. हे ओबीसी समाज व आम्हा सर्वांसाठी आनंदाचे आहे. या आरक्षणाप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात. कारण कोणतीही निवडणुकी वेळेत व्हावी ते लोकशाहीसाठी पोषक असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडे यांनी केलं निर्णयाचे स्वाग - ओबीसी आरक्षणाच्या ( OBC reservation ) प्रकरणावर न्यायमूर्ती खानविलकर ( Justice Khanwilkar ) यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) राज्य सरकारला चांगलेच फटकारले असून दोन आठवड्यांत निवडणुका घ्या, न्यायालयाची दिशाभूल करू नये असे ताशेरे राज्य सरकारवर ओढले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने बांठिया समितीचा अहवाल मान्य करीत ( Banthia Committee ) ओबीसींना राजकीय आरक्षण ( OBC reservation ) देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री विजय वडेट्टीवार आणि धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.