अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये बुधवारी ४१ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले , तर खाजगी प्रयोगशाळेत ७ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ३६७ इतकी झाली आहे. बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या ७२७ इतकी झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या अहवालानुसार, कोरोना टेस्ट लॅब मध्ये कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर ३१, अकोले ०५, अशा रुग्णाचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात निमोन ०३, कासार दुमाला ०२, गुंजाळ वाडी ०२, माहुली ०८, साकुर ०१, तळेगाव दिघे ०१, वडगाव ०१, संगमनेर शहरातील १३ जण बाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात देवठाण ०१, उंचाखडक ०१, चास ०३ असे रुग्ण आढळून आले आहेत.
अहमदनगर महापालिका क्षेत्रात ०५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर मनपा ०१, राहाता ०१ आणि संगमनेर तालुक्यातील ०५ जणांचा समावेश आहे.