अहमदनगर - जिल्ह्यात दिवसभरात एकूण ६६ रुग्णांची भर पडल्याने कोरोना जिल्हाभर पाय पसरत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी सकाळी ३० तर रात्री ३६ रुग्णांचे कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आले. तर दिवसभरात १३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तसेच २०२ व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये रात्री ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील १३, सोनई (नेवासा) येथील १०, संगमनेर तालुक्यातील ०९, श्रीगोंदा तालुक्यातील ०२, शेवगाव तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे एक, सिद्धार्थनगर ०२, चितळे रोड ०६, टिळक रोड ०१, सारस नगर ०१, सावेडी ०१, शिंपी गल्ली ०१ असे रुग्ण आढळून आले.
तसेच नेवासा तालुक्यातील सोनई येथे १० रुग्ण बाधित आढळून आले. संगमनेर तालुक्यात हिवर गाव पावसा ०१, गुंजाळ मळा ०२, कसारा दुमाला ०१, मिर्झापूर ०१, घुलेवाडी ०३, चास पिंपळदरी ०१ असे रुग्ण आढळून आले. तसेच श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा ०१, चांबूर्डी ०१ असे रुग्ण आढळून आले.
शेवगाव तालुक्यातील निंबे नांदूर येथे एक रुग्ण आढळून आला. भिंगार येथील गवळी वाडा येथेही एक बाधित रुग्ण आढळून आला. याशिवाय, खासगी प्रयोगशाळेत कोरोनाबाधित आढळून आलेल्या ९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा क्षेत्रातील ०३, राहाता ०३, श्रीरामपूर ०२ आणि पाथर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
• उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या: २८०
• बरे झालेले रुग्ण: ४९४
• मृत्यू: २०
• एकूण रुग्ण संख्या: ७९४