ETV Bharat / state

'लाचखोर नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा' युवक राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर घणाघात - युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख बातमी

पूर्वी आपण चित्रपटात बघितले असेल की, एखाद्याला सुपारी दिली जायची मात्र आता वेगळ्या पद्धतीने सुपारी दिली जाते आणि ती म्हणजे चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याची. तशाच पद्धतीने माझ्यावर खोटे आरोप त्यांनी केले होते, अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

म
author img

By

Published : Sep 6, 2021, 9:01 PM IST

अहमदनगर - अहो चित्रा वाघ आधी नीतिमत्ता तुमच्या लाचखोर नवऱ्याला शिकवा, मग मेहबूब शेख आणि आमदार निलेश लंके यांना शिकवा, असे म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर घणाघात करत खोचक टीका केली. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आणि आत्मा कमिटी अध्यक्ष ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे उद्घाटन कार्यक्रमात शेख बोलत होते. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले.

बोलताना मेहबूब शेख व आमदार लंके

मंत्री तनपुरेंच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या वनकुटे गावातील विकास कामांचा शुभारंभ राज्याचे नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मेहबूब शेख यांनी आपल्या भाषणात जोरदार टोलेबाजी करत चित्रा वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

चांगल्या व्यक्तीला बदनामीची सुपारी

यावेळी बोलताना, पूर्वी आपण चित्रपटात बघितले असेल की, एखाद्याला सुपारी दिली जायची मात्र आता वेगळ्या पद्धतीने सुपारी दिली जाते आणि ती म्हणजे चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्याची, असे शेख म्हणाले. चित्रा वाघ दिवस-रात्र माझ्याही नावाचा जप करतात. आमदार निलेश लंके आणि तहसीलदार ज्योती देवरे यांच्याबाबत ज्या चुकीच्या पद्धतीने हे प्रकरण पुढे आणण्यात आले तशाच पद्धतीने माझ्यावर खोटे आरोप त्यांनी केले होते. त्यावेळी मी माझी नार्को टेस्ट करा सत्य समोर येईल, असे आव्हान त्यांना दिले होते. आम्हाला नीतिमत्ता शिकवण्याआधी आपल्या लाचखोर पतीला नीतिमत्ता शिकवा, अशी घणाघाती टीका शेख यांनी केली. चित्रा वाघ यांच्या पतीने मेलेल्या माणसाच्या प्रकरणात लाच मागीतली आहे, पोलीस दप्तरी याची नोंद आहे, माझ्याबद्दल एक पुरावा तुम्हाला देता आला नाही, असा दावा शेख यांनी यावेळी केला.

प्राजक्त तनपुरें कडून आमदार लंकेंचे कौतुक

यावेळी वनकुटे गावचे पहिले लोकनियुक्त सरपंच आणि आमदार निलेश लंके यांचे समर्थक ऍड. राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. यावेळी रस्त्यांची निर्मिती, पाणी पुरवठा, लोकांचे आरोग्य या महत्वाच्या विषयांना प्राधान्य देत आमदार निलेश लंके करत असलेल्या समाजकार्य कार्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी कौतुक केले. सोबतच पारनेर तालुक्यात 33/11 केव्हीचे सबस्टेशन पुनेवाडी येथे मंजूर करण्यात आले आहे. तसेच 33/11 केव्ही आळकुटी येथे अतिरिक्त 5 एमव्हीएचे सबस्टेशन निलेश लंके यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आल्याचे सांगत तनपुरे यांनी लवकरच या सबस्टेशनची निर्मिती करून लोकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे म्हटले.

आमदार नव्हे, स्थानिक स्वराज्यची तिकिटे पक्ष ठरवणार, लंकेच्या कानपिचक्या

आपल्या भाषणात आमदार निलेश लंके यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती गट-गणांसाठी मोठी रेस दिसून येत आहे. पण, तिथे कोण माझ्या जवळचा असा विषय नसून तिकिटे आमदार नव्हे तर वरिष्ठ पक्ष पदाधिकारी ठरवतात. त्यामुळे जवळच्या पेक्षा जिंकणारा रेसचा घोडा कोण हे पाहून पक्ष निर्णय घेणार, असे सांगत इच्छुक कार्यकर्त्यांना आपल्या खास शैलीत कानपिचक्या दिल्या.

हेही वाचा - मोडला सुखी संसार.. अहमदनगरमध्ये १० वर्षांच्या मुलीसह एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.