ETV Bharat / state

Nationalist Congress party : ...तोपर्यंत हे शिंदे फडणवीस सरकार चालेल-अजित पवारांचे मोठे विधान

author img

By

Published : Nov 4, 2022, 2:11 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसने ( Nationalist Congress party ) साईंच्या शिर्डीत राज्यव्यापी मंथन शिबीर ( Rajyawyapi manthan shibir in shirdi ) आयोजित केले आहे. आजपासुन दोन दिवसीय शिबिरास राज्यातील दोन हजार पदाधिकारी उपस्थित राहतील.

Nationalist Congress party
शिर्डीत राष्ट्रवादीच्या विचारांचे मंथन

अहमदनगर (शिर्डी): आर आर पाटील गृहमंत्री असतांना पासष्ट हजार पोलीसांची भरती केली होती. मात्र अपयश झाकण्यासाठी फडणवीस शिंदे सरकारने ( Fadnavis Shinde Govt ) दिड दिड लाख नोकऱ्या ज्या उद्योगातुन राज्यातील नागरिकांना मिळणार होते, असे प्रकल्प बाहेर गेले आणि आता सांगतायेत की मोठे उद्योग येणार आहेत. राज्यात असे कोणते उद्योग येणार आहेत आणि किती लोकांची भरती होणार आहे, याची यादी दाखवा असे आवाहन अजित पवारांनी ( Ajit Pawar) शिंदे फडवणीस यांना केले आहे. जोपर्यंत शिंदेंना 145 आमदारांचा पाठींबा आहे तो पर्यंत हे सरकार चालेल ज्या दिवशी तो आकडा कमी होईल त्या दिवशी हे सरकार कोसळेल असे मी पुर्वीही सांगितले होते आणि आताही सांगतो असे वक्तव्य शिंदे फडणवीस सरकारच्या बाबत पवारांनी केले आहे.

शिर्डीत राष्ट्रवादीच्या विचारांचे मंथन

डॉक्टरांनी परवानगी दिली तर पवारसाहेब शिबिराला उपस्थिती राहतील : पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार ( Party President MP Sharad Pawar ) हे आजारी आहेत. डॉक्टरांनी परवानगी दिली नाही तर ते व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संबोधित करतील. डॉक्टरांनी परवानगी दिली तर स्वतः पवारसाहेब शिबिराला उपस्थिती राहतील असे अजीत पवारांनी सांगीतले आहे.स्थापनेपासून राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने साईंच्या शिर्डीत राज्यव्यापी मंथन शिबीर आयोजित केले आहे. आजपासुन या दोन दिवसीय शिबिरास राष्ट्रीय अध्यक्ष शहराध्यक्षांपर्यंत सुमारे दोन हजार पदाधिकारी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर अडीच वर्षांत झालेले सत्तांतर ईडी चौकशांचे सत्र राष्ट्रवादीचा मित्रपक्ष शिवसेनेत भाजपने घडवून आणलेली मोठी फूट राज्यात सुरू असलेले भाजपचे फोडाफोडीचे आक्रमक राजकारण या पार्श्वभूमीवर हे शिबिर होत आहे.

शिबीरासाठी पक्षाचे सर्व प्रमुख नेते हजर : शिर्डीत आजपासुन दोन दिवस असलेल्या राष्ट्रवादीच्या मंथन शिबीरासाठी पक्षाचे सर्व प्रमुख नेते हजर आहेत. आदिवेशनच्या आधी बहुतांशी नेत्यांनी साई मंदीरात जावुन साईबाबांचे आशिर्वाद घेतलेत. महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत त्यांचा सत्कार केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.