ETV Bharat / state

Nagar Panchayat Elections : कर्जतमध्ये राष्ट्रवादी-भाजप तर पारनेरमध्ये राष्ट्रवादी-सेना लढत, रोहित पवार-राम शिंदे सामना - Parner Nagar Panchayat Elections

राज्यात 105 नगर पंचायतीच्या निवडणुका (Nagar Panchayat Elections 2021) मंगळवारी पार पडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, अकोले आणि शिर्डी नगर पंचायतीच्या निवडणुका (Nagar Panchayat Elections in Ahmednagar ) आहेत. मात्र शिर्डीत नगरपालिकेचा आग्रह सर्वपक्षीय झाला आणि त्यामुळे येथे कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेच नाही, त्यामुळे अहमदनगर उत्तरेत अकोले तर दक्षिणेत कर्जत आणि पारनेर येथे निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार चांगलाच  रंगतदार झाला. कर्जतच्या निकालाची (Rohit Pawar-Ram Shinde big fight in Karjat ) चांगलीच उत्सुकता ताणली आहे.

Nagar Panchayat Elections 2021
Nagar Panchayat Elections 2021
author img

By

Published : Dec 20, 2021, 5:15 PM IST

अहमदनगर - राज्यात 105 नगर पंचायतीच्या (Nagar Panchayat Elections 2021) निवडणुकांचा प्रचार रविवारी थंडावला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत पक्षीय आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराची सांगता केली.

कर्जत, पारनेर, अकोले येथे मंगळवारी मतदान -

अहमदनगर जिल्ह्यातील (Nagar Panchayat Elections in Ahmednagar ) कर्जत, पारनेर, अकोले आणि शिर्डी नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. मात्र शिर्डीत नगरपालिकेचा आग्रह सर्वपक्षीय झाला आणि त्यामुळे येथे कोणत्याही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केलेच नाही, त्यामुळे अहमदनगर उत्तरेत अकोले तर दक्षिणेत कर्जत आणि पारनेर येथे निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार चांगलाच रंगतदार झाला.

कर्जतमध्ये रोहित पवार-राम शिंदे सामना
कर्जत-पारनेर राज्यात लक्षवेधी निवडणूक -

यात विशेष करून नगर दक्षिणेतील कर्जत आणि पारनेरयेथील (Parner Nagar Panchayat Elections) प्रचारात मोठी रंगत आणि राजकीय संघर्षातून आरोप-प्रत्यारोप होत मोठे राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले. या ठिकाणी झालेल्या सभा पाहता या निवडणुका नगर पंचायतीच्या आहेत की लोकसभेच्या आहेत, असा प्रश्न पडावा असे शक्तीप्रदर्शन राजकीय पक्षांनी केले. यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपने मोठी ताकत लावत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

कर्जत मध्ये रोहित पवार विरुद्ध राम शिंदे सामना -

2009 आणि 2014 मधे कर्जत-जामखेड मतदारसंघात राम शिंदे भाजपकडून आमदार होते. 2019 पूर्वी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. 2014 ला भाजपकडून निवडून आल्यानंतर राम शिंदे गृहराज्यमंत्री आणि नंतर जलसंधारण मंत्री झाले तसेच त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही सरकारने दिले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जवळचे तर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील अशी ओळख असलेले राम शिंदे यांचे आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात एकहाती वर्चस्व दिसून आले. मात्र 2014 नंतर शरद पवारांचे नातू तर अजित पवारांचे पुतणे (Rohit Pawar-Ram Shinde big fight in Karjat ) अशी ओळख आणि बारामती ऍग्रोची ताकत घेऊन रोहित पवार कर्जत-जामखेड मध्ये डेरेदाखल झाले आणि बघता-बघता रोहित यांनी राम शिंदेंचा गड कधी कमकुवत केला हे शिंदेंना पण समजले नाही.

शिंदेंसाठी वर्चस्व आणि अस्तित्वाची लढाई -

2019 ला तत्कालीन जलसंधारण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले राम शिंदे यांना मोठ्या फरकाने पराभूत करत रोहित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Rohit Pawar-Ram Shinde big fight in Karjat ) आमदार झाले. त्यानंतर रोहित यांनी कुठेही न थांबता जामखेड आणि कर्जत तालुक्यातील भाजप सतत खिळखिळीत केली. याचा परिपाक सध्या पार पडत असलेल्या कर्जत नगरपंचायत निवडणुकीत दिसून आला. उमेदवारी माघारीच्या दिवशी एका महिला भाजप उमेदवाराने माघार घेत राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला, तर हार्दिक पटेल यांच्या जाहीर सभेत एका भाजप उमेदवाराने गळ्यात राष्ट्रवादीचा पंचा घालत राष्ट्रवादी उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. एकूण निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी कडून आ. रोहित पवार यांनी राम शिंदे अर्थात भाजपवर कुरघोडी करत केंद्रस्थानी राहण्याचा प्रयत्न केला. या निवडणूक निकाला कडे जिल्ह्याचे लक्ष असून आ. रोहित यांच्या वर्चस्वाची तर राम शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या निवडणूक निकालाकडे पाहिले जात आहे.

पारनेरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच लढत -

राज्यात सेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे आघाडी सरकार असले तरी पारनेरमध्ये (Parner Nagar Panchayat Elections) मात्र राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढाई आहे. 2005, 2009 आणि 2014 असे सलग तीनदा शिवसेनेकडून निवडून आलेले विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांना 2019 मात्र नवख्या आणि माजी शिवसैनिक राहिलेल्या निलेश लंके यांनी मोठ्या फरकाने पराभूत करत राज्याचे लक्ष वेधून घेतले. जनसामान्यांत आपला साधा फटका माणूस अशी ओळख निर्माण करत आ.निलेश लंके यांनीही औटी यांना अनेक ठिकाणी नामोहरण करण्याचा प्रयत्न केला. मधल्या काळात तर विजय औटी सक्रिय राजकारणात आहेत की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच पारनेर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विजय औटी पुन्हा आक्रमकपणे उभे राहत आ. निलेश लंके यांच्या विरोधात दंड थोपटले. शिवसेनेचे जिल्ह्यातील असलेले जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी औटी यांना ताकत दिली. त्यामुळे आता पारनेर पंचायत निवडणूक या दोन्ही नेत्यांनी मोठी प्रतिष्ठेची केली आहे.

ओबीसी जागा वगळून 13 जागांवर मतदान -

उद्या रविवारी कर्जत, पारनेर, अकोले या जिल्ह्यातील नगर पंचायतीसाठी मतदान होणार आहे. मोकळ्या ठेवलेल्या ओबीसी जागांवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याचे ठरवल्याने एकत्रित मतमोजणी पुढील वर्षी 19 जानेवारी रोजी होणार असल्याने निवडणुकीची उत्सुकता ही ताणलेली असणार आहे. कर्जतमध्ये 13 जागांसाठी 11 हजार 500 मतदार आहेत तर पारनेर मध्ये 13 जागांसाठी 11 हजार मतदार आहेत.

2019 मध्ये बदललेल्या राजकीय गणितांचा प्रभाव -

2014-15 सालात या नगरपंचायती राज्य सरकारच्या निर्णयाने अस्तित्वात आल्या. पहिल्या टर्ममध्ये कर्जतमध्ये भाजप तर पारनेर मध्ये शिवसेना सत्तेत होती. 2020 मध्ये कोरोनामुळे एक वर्षापेक्षा जास्त काळ निवडणुका स्थगित राहिल्या. दरम्यान 2019 च्या विधानसभा निवडणुकीत येथील राजकीय गणिते बदलल्याने आता दुसऱ्या टर्मला लागणारा निकाल हा उत्सुकतापूर्ण ठरणारा असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.