अहमदनगर - महापालिका आरोग्याधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नरसिंह एस. पैठणकरला अडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पैठणकरला एसीबीने रंगेहाथ पकडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाकडून सावेडी कचरा डेपो येथे ही कारवाई करण्यात आली. ठेकेदाराच्या बिलातील त्रुटी दूर करून बील मंजूर करण्यासाठी ठेकेदराकडे पाच लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता अडीच लाख रुपये स्वीकारताना पथकाने ही कारवाई केली.
महापालिकेत खळबळ
पैठणकर हे घनकचरा अधिकारी झाल्यापासून नेहमीच वादग्रस्त आणि चर्चेत राहिले. नगरसेवकांनी पैठणकर यांच्या विरोधात अनेकवेळा आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र पैठणकर यांच्यावर कोणीतीही कारवाई झाली नव्हती. बुधवारी सकाळी त्यांना नाशिक विभागाच्या लाचलुचपत विभागाने ठेकेदार कंपनीकडून लाच घेताना पकडले. पथकाने पैठणकर यांच्याकडून पथकाने मोठी रक्कम हस्तगत केली आहे. पैठणकरवर कारवाईची खबर महापालिकेत येताच एकच खळबळ उडाली आणि चर्चेला उधाण आले. या निमित्ताने महानगरपालिकेत भ्रष्टाचार फोफावला असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.