ETV Bharat / state

खासदार दिलीप गांधींच्या पुत्राने फडकावले बंडाचे निशाण, पुत्राला पाठिंबा नसल्याचे गांधींचे वक्तव्य

दरम्यान, दिलीप गांधींना प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. बाहेरुन आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी भावना मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केली.

सुवेंद्र आणि दिलीप गांधी
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:07 AM IST

Updated : Mar 25, 2019, 10:55 AM IST

अहमदनगर - दक्षिण अहमदनगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांच्या पुत्राने भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा सुवेंद्र गांधी यांनी दिली आहे. पण, मुलाच्या या निर्णयाला आपला पाठिंबा नसल्याचे दिलीप गांधी यांनी सांगितले आहे. गांधी पिता-पूत्र मिळून पक्षावर दबावतंत्र निर्माण करत असल्याचे बोलले जात आहे.

सुवेंद्र यांनी उमेदवारीवर दावा केला असाला, तरी दिलीप गांधींनी पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे

दक्षिण अहमदनगरची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या सुजय विखे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज आहेत. याबाबत त्यांना स्वतः उघड बंडाची भूमिका घेतली नसली तरी मुलाच्या आडून ते पक्षावर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या मेळाव्यात सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली. तर त्याच ठिकाणी दिलीप गांधी यांनी मात्र याला आपला पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आपण भाजपचेच काम करणार आहोत. उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तिव्र आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि मुलाने असा निर्णय घेतला. पण, मी जनसंघापासून पक्षाचे काम करतो. मुलाची आणि कार्यकर्त्यांची समजूत काढू, असे ते म्हणाले.

दरम्यान, दिलीप गांधींना प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. बाहेरुन आलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो अशी भावना मेळाव्यात अनेकांनी व्यक्त केली. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिलीप गांधींना प्रदेशाध्यक्षपद द्यावे अशी मागणी काहीजणांनी केली.

२००४ साली दिलीप गांधी केंद्रीय राज्यमंत्री असताना त्यांचे तिकीट कापून प्रा. ना. स. फरांदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, त्यावेळीही गांधींनी पक्षाची भूमिका मान्य केली होती. त्यामुळे यावेळीही ते पक्षासोबतच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, मुलाची उमेदवारी पुढे करत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे सांगितले जात आहे.

Intro:अहमदनगर- खा.दिलीप गांधी भाजपा सोबतच तर त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी बंडाच्या पावित्र्यात.. सुवेंद्र यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय..

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- खा.दिलीप गांधी भाजपा सोबतच तर त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी बंडाच्या पावित्र्यात.. सुवेंद्र यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय..

अहमदनगर- उमेदवारी मुळे सुरुवातीपासून चर्चेत असलेला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाततील राजकीय 'ट्विस्ट' अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीये. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या विद्यमान भाजप खा.दिलीप गांधी आणि त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पिता-पुत्रांनी स्वतंत्र भूमिका मांडल्याने या निवडणुकीत प्रचारपूर्व रंगत कायम आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आणि वडिलांनी मतदारसंघात केलेली कामे मात्र झालेला अन्याय यामुळे सुवेंद्र यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला तर याच मेळाव्यात खा.गांधी यांनी मात्र आपण भाजपचेच काम करणार असून मुलाच्या भूमिकेला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्या तरी आपण जनसंघा पासून पक्षाचे काम करत आलेलो आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि मुलाची समजूत काढू असे गांधी यांनी सांगितले.

खा.गांधींना प्रदेशाध्यक्ष पद द्या-
तीन वेळेस नगर दक्षिणेतून खा. गांधी यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात त्यांना कधीही पराभव पाहिलेला नाही, असे असताना बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याबद्दल मेळाव्यात अनेकांनी संताप व्यक्त केला. मेळाव्यास मोठी गर्दी जमल्याने अनेक निष्ठावन नेत्यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी बद्दल फेर विचार करून खा.गांधी यांनाच उमेदवारी द्यावी असे मत मांडले. तर काहींनी रावसाहेब दानवे यांना पक्षाने उमेदवारी दिली असल्याने त्यांचे प्रदेशाध्यक्ष पद दिलीप गांधी यांना देऊन त्यांचा सन्मान करावा अशी मागणी केली.

गांधी पिता-पुत्रांचे पक्षावर दबावतंत्र !!
-एकाच मेळाव्यात पिता-पुत्रांनी परस्परविरोधी भूमिका मांडल्याने सुवेंद्र खरच निवडणूक लढवणार का असा प्रश्न निर्माण होत, मुलाला पुढे करत खा.गांधी यांनी पक्षावर एकप्रकारे दबावतंत्राचा वापर केला असल्याचे बोलले जाते. 2004 साली याच प्रकारे विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतानाही दिलीप गांधी यांचे तिकीट कापून प्रा.(स्व.)ना.स.फरांदे यांना पक्षाने उमेदवारी दिली होती.मात्र त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवाराने पराभव केला होता. त्यावेळीही गांधी पक्षसोबतच राहिले होते. आताही एकंदरीत त्यांची मानसिकता पक्षासोबतच राहण्याची आहे. मात्र यावेळी त्यांनी मुलाच्या अपक्ष उमेदवारीच्या माध्यमातून पक्षावर दबाव वाढवून आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे बोलले जातेय. सुजय विखे विजयी झाल्यास गांधी यांचे पुढे राजकीय भवितव्य काय असा प्रश्न असल्याने सुवेंद्र यांची उमेदवारी पुढे करून राजकीय भविष्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हे दबावतंत्र असू शकते असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.. या दबावतंत्राची दखल पक्षाने घेत त्यांना काही शब्द दिल्यास सुवेंद्र हे आपली उमेदवारी मागे घेतील असेही बोलले जातेय.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- खा.दिलीप गांधी भाजपा सोबतच तर त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी बंडाच्या पावित्र्यात.. सुवेंद्र यांचा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय..
Last Updated : Mar 25, 2019, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.