ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये मनसेने घातली महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूची अंघोळ

एकीकडे सर्व आस्थापना,दुकाने बंद ठेवण्यात आली असताना वाईनशॉप मात्र घरपोच विक्रीच्या नावाखाली अर्धवट शटर उघडे करून सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महाविकासआघाडी सरकार हे व्यापारी विरोधात असून फक्त दारुविक्रेत्यांचे आहे, असा आरोप करत मनसेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

मनसे आंदोलन
मनसे आंदोलन
author img

By

Published : May 28, 2021, 9:56 PM IST

अहमदनगर - गेल्या अनेक दिवसांपासून नगर शहरातील सर्व बाजारपेठा, किराणा दुकाने, भाजीपाला विक्रीला बंदी आहे. मात्र दारूची दुकाने घरपोच विक्रीच्या नावाखाली उघडी असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शहरात राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दारूने अंघोळ घालत आंदोलन केले.

महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूची अंघोळ
किराणा,भाजीपाला विक्री,आस्थापना बंदच

शहरातील रुग्णसंख्या कमी होत नसल्यामुळे मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी मनपा हद्दीत मे महिन्याच्या सुरुवातीपासून कडक लॉकडाऊन सुरू केला. त्यानुसार केवळ आरोग्यसेवा वगळता सर्व आस्थापना, किराणा, चिकन, मटण दुकाने बंद ठेवताना भाजीपाला विक्रीला बंदी घालण्यात आली. यापैकी कोणतेही दुकान सुरू दिसल्यास तब्बल दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. काही दुकाने सील करण्यात आली, तर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एकीकडे सर्व आस्थापना,दुकाने बंद ठेवण्यात आली असताना वाईनशॉप मात्र घरपोच विक्रीच्या नावाखाली अर्धवट शटर उघडे करून सुरू असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महाविकासआघाडी सरकार हे व्यापारी विरोधात असून फक्त दारुविक्रेत्यांचे आहे, असा आरोप करत मनसेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

'व्यापारी बाजारपेठ सुरू करा'

गेले अनेक दिवस शहरातील बाजारपेठ, किराणा दुकाने बंद असल्याने व्यापारी हवालदिल झाले असल्याने एक जूनपासून बाजारपेठ सुरू करावी, अशी मागणी विविध राजकीय पक्षांकडून मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे. व्यापारी असोसिएशनने या मागणीचे निवेदन शहराचे आमदार संग्राम जगताप यांना दिले आहे.

हेही वाचा-संभाजीराजेंच्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात दोन दिवसाचे अधिवेशन जाहीर करा - चंद्रकांत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.