ETV Bharat / state

जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह एका माजी मंत्र्याला कोरोनाची लागण

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्हा
अहमदनगर जिल्हा
author img

By

Published : Dec 31, 2021, 9:12 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat Tested Corona Positive ) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काही मंत्री आणि आमदार यांच्यासह अधिवेशनास उपस्थित कर्मचारी पोलिस आणि पत्रकार यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. वाढता कोरोना संसर्ग विचारात घेत अधिवेशन गेल्या दोन दिवसापूर्वी संपवण्यात आले होते. या अधिवेशनानंतर बुधवारी नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याबाबत या दोन्ही नेत्यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती देत संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती. आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.

नगर विकासमंत्री प्राजक्त तनपुरे -

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आणि नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तब्येत व्यवस्थित आहे. या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली काळजी घ्यावी. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत ही विनंती तनपुरे यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली आहे.

माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील -

शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती विखे पाटील यांनी ट्विट करून दिली. आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली असल्याने मी स्वतः विलीगीकरणात जात आहे. माझे पुढील काही दिवसांचे कार्यक्रम रद्द करावे लागत असल्यामुळे आयोजकांच्या गैरसोयी बद्दल क्षमस्व. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी. त्याचबरोबर त्यांनी इतरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात -

संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसपक्षाचे आमदार आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढील उपचार घेणार आहोत. असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. थोरात यांनी ट्विट करत सांगितले की. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोणतेही लक्षण नाही. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे. आपण मास्क वापरावा आणि काळजी घ्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.