अहमदनगर - महिलांसाठी वुमन्स डे, मदर डे आदी दिवस साजरे होत असतात. मात्र, पुरुषांच्या नशिबी असे साजरे करण्याचे दिवस कमीच असतात. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक कार्यात कार्यरत असणाऱ्या महिला-भगिनींनी पुरुष हक्क दिनाचे औचित्य साधत पुरुषांसाठी 'ट्रु मेन्स' नामक उपक्रम राबवला. यामध्ये बाईक रॅली, ट्रेकिंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी पुरुषांचा सन्मान केला.
ट्रेककॅम्प ट्रेकिंग संस्था, आनंदम मनोविकास संस्था, बियु संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरुष कायम वडील, भाऊ, पती, मुलगा या स्वरुपात कुटुंबाशी आणि समाजाशी एकरूप राहून सर्व भूमिका पार पाडत असतो. यासाठी पुरुषांचा सन्मान करण्यासाठी पुरुष हक्क दिनाचे औचित्य साधून महिलांनी पुरुषांसाठी बुलेट रॅली काढली. तसेच नगरच्या जवळच असलेल्या ऐतिहासिक चांदबीबी या ठिकाणी ट्रेकचे आयोजन केले. यावेळी सहभागी पुरुषांना टिळा लावून त्यांचे औक्षण करण्यात आले.