शिर्डी (अहमदनगर) : महिला अनेक दिवसांपासून डिप्रेशनमधे असल्याची माहिती मैत्रीणींकडून मिळाली आहे. तिने जन्म तारखेसह मृत्यूचा स्टेटस ठेवल्याने मैत्रीणींना तिच्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत समजले. मैत्रिणींनी संबंधित महिलेला तिच्या मुलांसह तात्काळ साईबाबा रुग्णालयात दाखल केले.
मुलांची प्रकृती अस्थिर : स्वतः बरोबरच दोन्ही मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्नातून महिलेने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याची प्राथमिक माहिती आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. महिलेचा प्रकृती स्थिर असली तरी तिच्या मुलांची प्रकृती अस्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगी ईश्वरी ( वय 14 वर्षे) आणि मुलगा आदित्यला (वय 10 वर्षे) पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.