कोपरगाव Marathwada Water Issue : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून मराठावाड्यातील जायकवाडीला पाणी सोडण्याच्या हालचालींना राज्य सरकारकडून वेग आला आहे. राज्य सरकारच्या या धोरणाविरोधात नगर जिल्ह्यातील नेते एकवटले आहेत. याप्रकरणी कोपरगाव येथील संजवनी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं सुप्रिम कोर्टात याचिका दाखल आहे. अलिकडंच 21 नोव्हेंबरला यावर सुणवणी पार पडली. मात्र यावेळी न्यायालयानं पाणी सोडण्याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नसल्याचा दावा कोपरगावच्या नेत्यांनी आहे. यानंतर संजवनी आणि प्रवरा सहकारी साखर कारखान्यांच्या वतीनं दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. न्यायालय जोपर्यंत अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत पाणी सोडू नये, अशी मागणी भाजपा नेते विवेक कोल्हे यांनी केली. राज्य सरकानं पाणी सोडण्याची घाई केल्यास हजारो शेतकऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा कोल्हे यांनी दिल्यानं पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक : कोपरगावच्या शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनीही मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेबाबत निर्णय होईपर्यंत जायकवाडीला पाणी सोडणं हा मुबंई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल, असं राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय. जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत न्यायालयानं 23 सप्टेंबर 2016 रोजी दिलेल्या आदेशाचा अवमान असून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळानं 30 ऑक्टोबर रोजी कुठलीही शहानिशा न करता नगर-नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय दिला होता. जोपर्यंत पाण्याची कमतरता तयार होणार नाही. तोपर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणं पाणी सोडता येणार नाही. ही कुठलीही गोष्ट न पाळता पाणी सोडण्याचा निर्णय करुन उच्च न्यायालयाच्या 23 सप्टेंबर 2016 च्या निकालाचा एकप्रकारे अवमान केलाय. जर पुन्हा पाणी सोडण्यात आलं तर तो पुन्हा एकदा कोर्टाचा अवमान होईल. जर असं घडलं तर इतर संबंधित सर्वांवरच न्यायालय अवमान प्रकरणी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
जायकवाडीला पिण्याचं पाणी सोडण्याची गरज नाही : अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळं दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. जायकवाडी धरणात पुरेसा पाणीसाठा असून योग्य नियोजन केल्यास हे पाणी वर्षभर पुरेल, तेव्हा जायकवाडीला पिण्याचं पाणी सोडण्याची गरज नाही. गरज वाटल्यास त्यांनी डेड वॉटरमधून पाणी पिण्यासाठी वापरावं, असंही नगर जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितलंय.
हेही वाचा :