अहमदनगर - मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयाने केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता दोनच मार्ग शिल्लक आहेत. ते केंद्र सरकार आणि न्यायालयाशी निगडित असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणासाठी दोनच मार्ग आपल्यासमोर -
भाजपचे आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राची पुर्नविचार याचिका फेटाळली असली तरी राज्य सरकारचे अधिकार अबाधित असल्याविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी हे मत मांडले. आशिष शेलार वकील असतील मात्र मला 102 व्या घटना दुरुस्ती वरून न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत जेवढे समजते, त्यावरून मराठा आरक्षण हा विषय आता रस्त्यावरील नसून न्यायालयातील आहे असे संभाजीराजे यांनी सांगितले. यासाठी दोनच मार्ग आपल्या समोर आहेत. राष्ट्रपतींच्या सहमतीने किंवा वटहुकूम काढूनच आपल्याला मराठा आरक्षण मिळवता येणार आहे असेही ते म्हणाले.
जामखेडमध्ये संवाद यात्रा -
खासदार संभाजीराजे छत्रपती संवाद यात्रा सुरू केली आहे. या निमित्ताने ते बहुजन समाजातील अठरा पगड समाजाशी ते संवाद साधत आहेत. शुक्रवारी पुणे ते दौंड मार्गे ते नगर जिल्ह्यातील जामखेड येथे आले. पुढे ते बीडला जाणार आहेत. जामखेडमध्ये आले असता विविध संघटना, विविध समाजातील नेते, कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी, मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपतींचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, वंचित आघाडीचे अरुण जाधव आदी नेते उपस्थित होते.
निवारा केंद्रावर वंचित मुलांसोबत छत्रपतींनी घेतले जेवण -
भटक्या विमुक्त जाती, लोककलावंत, ऊस तोडणी मजूर, वीट भट्टी कामगार यांच्या मुलांसाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या माध्यमातून जामखेड येथे निवारा केंद्र चालवले जाते. या ठिकाणी या मुलांचे संगोपन आणि शिक्षण केले जाते. या मुलांसोबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बसत दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला. आपले वेगळेपण आणि मनाचा मोठेपणा दाखवला.
हेही वाचा - शिर्डीच्या साईबाबा संस्थानमार्फत चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील औषध खरेदी व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात