ETV Bharat / state

शिर्डीत भिशीचे पैसे न भरल्याने एकाला बेदम मारहाण; परस्परांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊन काळात फायनान्स कंपनी आणि बॅंकांनी हफ्ते वसूली करु नये, अशी सक्त ताकीद सरकारने दिलेली आहे. असे असताना अनाधिकृतपणे चालणाऱ्या भिशींवर कोणतेही निर्बंध नसल्याची बाब शिर्डीतील या घटनेवरून समोर आली आहे.

shirdi crime news
शिर्डी क्राईम
author img

By

Published : Jun 23, 2020, 5:58 PM IST

अहमदनगर : शिर्डी शहरातील लुटे वस्ती येथील जालिंदर भगवान आसणे याने भिशीचे पैसे भरले नाही म्हणून काही युवकांनी त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी जालिंदर आसणे याला साईबाबा सुपर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. लॉकडाऊन काळात फायनान्स कंपनी आणि बॅंकांनी हफ्ते वसूली करु नये, अशी सक्त ताकीद सरकारने दिलेली आहे. असे असताना अनधिकृतपणे चालणाऱ्या भिशींवर कोणतेही निर्बंध नसल्याची बाब शिर्डीतील या घटनेवरून समोर आली आहे.

शिर्डी शहरातील लुटे वस्ती येथे भिशीचे पैसे न भरल्याने एकाला बेदम मारहाण...

हेही वाचा... लॉकडाऊन इफेक्ट; पगार कमी झालेल्या शिक्षिकेची सावकारी त्रासामुळेच आत्महत्या, सुसाईड नोटमधून उघड

जखमी जालिंदर आसणे याने शिर्डी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरुन काटकर हा भिशी चालक होता. तर जालिंदर याच्या भिशीचा हफ्ता बाकी होता. मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने जालिंदर ते पैसे देऊ शकला नाही. त्यामुळे शिर्डीतील गणेश मारुती काटकर, रमेश काटकर, रवि काटकर, सुनिल काटकर, नामदेव काटकर यांनी त्याला जबर मारहाण केली. गणेश काटकर याने गैर कायदा माणसे जमवून लोखंडी कोयत्याने आणि रमेश काटकर याने लोखंडी रॉडच्या साहाय्याने डोक्यावर, गळ्यावर जबर मारहाण केल्याचे जालिंदर आसणे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

परस्परांवर गुन्हे दाखल....

जखमी जालिंदर आसणे याने काटकर याच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर. आसणे याच्या विरोधात अलका दामू काटकर या महिलेने फिर्याद दिली आहे. यात जालिंदर भागवत आसणे हा आठ दिवसापासून त्रास देत असून आपल्या जाऊबाई सोबत लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी जालिंदर आसणे याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आसणे आणि काटकर यांनी एकमेकांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आधिकचा तपास पोलीस उपआधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक गंधाले आणि उपनिरिक्षक मिथुन घुगे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.