ETV Bharat / state

Mahashivratri Celebration Shirdi : साईबाबांच्या मंदिरातही महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा; भाविकांना प्रसाद म्हणुन साबुदाणा खिचडी - महाशिवरात्री साबुदाणा खिचडी प्रसाद 2022

आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ( Mahashivratri Celebration in India ) साईबाबांच्या शिर्डीमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ( Mahashivratri Celebration in Shirdi )

mahashivratri shirdi
महाशिवरात्री, शिर्डी
author img

By

Published : Mar 1, 2022, 3:49 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ( Mahashivratri Celebration in India ) साईबाबांच्या शिर्डीमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ( Mahashivratri Celebration in Shirdi ) सबका मलिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांनी आपल्या हयातीत भक्तांना अनेक रुपात दर्शन दिल्याने आज महाशिवरात्र निमित्ताने देश भरातून लाखो भक्त शिर्डी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. महाशिवरात्रीच्या निमित्ताने साई समाधीवर भगवान शंकर यांचा फोटो ठेवण्यात आला आहे. आज भक्त साईबाबांचे दर्शन भोलेनाथ यांच्या रुपात घेत आहेत.

याबाबत बोलताना शिर्डी साई संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत

20 हजार भाविकांनी घेतले दर्शन -

आज देश भरात सगळ्या देवादि देव महादेव मंदिरात भाविक दर्शन घेताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ दिसून येत आहे. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदान्याची खिचडी आणि झिरक देण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने साई संस्थानच्या प्रसादालयात 57 ​क्विंटल साबुदाणा 26 क्विंटल शेंगदाणे आणि 700 किलो वनस्पती, 114 किलो हिरवी मिरची, 20 क्विटल बटाटा, लाल मिरचीपासून 11623 किलो म्हणजे 106 क्विंटल सामुग्री वापरुन साबुदान्याची खिचडी बनवली आहे. ( Sabudana Khichadi Mahashivratri Prasad Shirdi ) ही खिचडी भक्त मोठ्या आनंदाने ग्रहण करत आहे. आतापर्यंत 20 हजार भाविकांनी साई प्रसादाचा लाभ घेतला आहे. आज महाशिवरात्री निमित्ताने अमेरिका येथील देणगीदार साईभक्‍त जयश्री शंकर यांच्‍या देणगीतुन साईबाबा समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली.

हेही वाचा - महाशिवरात्री उत्सव : अमरावतीमधील प्राचीन कोंडेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.