ETV Bharat / state

दिव्यांग वडिलांची इच्छा मुलांनी केली पूर्ण; कळसुबाई शिखर झाले सर - अंध व्यक्तीने कळसुबाई शिखर केले सर

माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मतःच अंध आहेत. सध्या ते संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्थायिक आहेत. त्यांनी भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर सर केले आहे. दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५,४०० फूट उंच प्रवास करीत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Dec 13, 2020, 7:50 PM IST

Updated : Dec 13, 2020, 10:16 PM IST

अहमदनगर - मूळचे नाशिकच्या येवला तालुक्यातील सावरगाव येथील माधव पंढरीनाथ सोनवणे हे जन्मतःच अंध आहेत. सध्या ते संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्थायिक आहेत. त्यांनी भंडारदरा परिसरातील सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर सर केले आहे. दिव्यांग असूनही त्यांनी तब्बल ५,४०० फूट उंच प्रवास करीत हे शिखर सर केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे.

अहमदनगर

सोनवणे यांचा विवाह सिंधुबाई मोरे यांच्याशी १९८९ साली झाला. सिंधुबाई ह्या डोळस असूनही त्यांनी एका दिव्यांग व्यक्तीला आधार देत आपला संसार थाटला. त्या एका शासकीय आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला तीन मुले असून ती उच्चशिक्षित आहेत. दोन अभियंते असून एक आर्थिक कंपनीमध्ये आहे. कळसुबाई शिखर सर करण्याची आपल्या दिव्यांग वडिलांची इच्छा मुलांनी पूर्ण केली आणि कळसुबाई शिखर सर झाले. आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याने सर्व कुटुंब आनंदी झाले आहे.

वाटेत भेटणाऱ्यांनी जिद्दीचे केले कौतुक

सोमवारी सकाळी ९ वाजता सोनवणे यांचा शिखर सर करण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांची पत्नी सिंधुबाई, मुले प्रथमेश, ऋषिकेश, अविनाश यांच्या मदतीने मुख्य वाटेला लागले. पुणे, नाशिक येथील बरेच पर्यटक तिथे आले होते. सोनवणे हे एकेक टप्पा पार करीत उंच लोखंडी शिडी मार्गापर्यंत पोहोचले. तोल सावरत कधी मुलांचा हात पकडत त्यांनी शिखर सर केले. वाटेत भेटणाऱ्यांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले, त्यांना शुभेच्छाही दिल्या. दुपारी तीन वाजता त्यांनी १६४० मीटर उंचीचे (५ हजार ४०० फुट) उंचीचे शिखर सर केले आणि दुपारी साडे चार वाजता त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. सायंकाळी आठ वाजता ते शिखरावरून ते खाली उतरले. कळसुमातेच्या दर्शनाची आस व जिद्दीने शिखर सर केल्याचा सोनवणे यांना आनंद झाला. हे शिखर सर करताना आपण दिव्यांग आहोत हे सुद्धा ते विसरून गेले होते.

Last Updated : Dec 13, 2020, 10:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.