ETV Bharat / state

Leopard Fell Well : भक्षाचा नादात बिबट्या पडला विहिरीत, तब्बल चार तासांच्या काढले बाहेर

राहता तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी अरुण चौधरी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला ( Leopard Fell Well in rahata ahmednagar ) होता. हा बिबट्या भक्षाचा पाठलाग करतांना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

author img

By

Published : Mar 7, 2022, 4:47 PM IST

Updated : Mar 7, 2022, 4:58 PM IST

Leopard Fell Well
बिबट्या पडला विहिरीत

अहमदनगर - राहता तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी अरुण चौधरी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला ( Leopard Fell Well in rahata ahmednagar ) होता. हा बिबट्या भक्षाचा पाठलाग करतांना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करत विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.

शेतकऱ्यांची प्रतिक्रिया

भक्षाचा नादात बिबट्या पडला विहिरीत -

राहाता तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठा प्रमाणात वाढत असल्याचे पहिला मिळत आहे. भक्षाचा पाठलाग करत असतांना राहाता तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी अरुण चौधरी यांच्या शेतीतील विहिरीत बिबट्या पडलाय. हा बिबट्या रात्रीच्या सुमारास भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज शेतकऱ्यांनाकडून वर्तवली जात आहे. आज सकाळी शेतकरी अरुण चौधरी हे आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले असतांना त्यांना विहिरीतून आवाज ऐकू आला म्हणुन त्यांनी विहिरीत डोकुवून पाहिले तर विहिरीतील मोटारीच्या लाकडावर बिबट्या दिसला. यानंतर चौधरी यांनी गावातील ग्रामस्थांना तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबटयाची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनासह घटनास्थळी दाखल झाले.

परिसरात भीतीचे वातावरण -

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडुन तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेंरबद करत सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. जळगाव आणि चितळी परिसरात बिबट्यांचा मोठा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा - Cairo Shooting World Cup : कैरो नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने जिंकले तिसरे सुवर्णपदक

Last Updated : Mar 7, 2022, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.