ETV Bharat / state

आजीसोबत जाणाऱ्या पाच वर्षाच्या बालकावर बिबट्याचा हल्ला, परिसरात दहशत

author img

By

Published : Aug 22, 2020, 10:46 PM IST

घराशेजारील रस्त्यावरून आजीसोबत नातू शौर्य हा जात होता. यावेळी त्याच्यावर बिबट्याने झडप घालून फरफटत ऊसाच्या शेतात नेले. प्रसंगावधान दाखवत आजी बिबट्याच्या मागोमाग पळाल्याने तोंडात धरलेल्या बालकाला सोडून बिबट्याने पळ काढला.

leopard
संग्रहित छायाचित्र

अहमदनगर - पाच वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने खळबळ उडाली. आजीच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या बालकाला सोडून पळाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगावातील ढगे मळा येथे आज सायंकाळी 6.40 वाजेच्या सुमारास घडली. शौर्य उमेश भगत असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे.

हा चिमुकला घराशेजारील रस्त्यावरून आजीसोबत जात होता. यावेळी त्याच्यावर बिबट्याने झडप घालून फरफटत ऊसाच्या शेतात नेले. प्रसंगावधान दाखवत आजी बिबट्याच्या मागोमाग पळाल्याने तोंडात धरलेल्या बालकाला सोडून बिबट्याने पळ काढला. तोपर्यंत आसपासचे लोक जमा झाले होते. जखमी बालकाला उपचारासाठी तातडीने नगर येथे हलविण्यात आले. या घटनेने कासार पिंपळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्याने अनेकांना दर्शन दिले आहे. याबाबत वनविभागाला कळविल्यानंतर काही दिवस या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र मध्यंतरी बिबट्याचे दर्शन न झाल्याने वनविभागाने पिंजरा इतरत्र हलविला होता. मात्र आज सायंकाळी 6.40 वाजेच्या दरम्यान कासार पिंपळगाव ते हनुमान टाकळी रोडवर असणार्‍या ढगे मळा येथे राहणार्‍या उमेश भगत यांच्या 5 वर्षाच्या शौर्य उमेश भगत याच्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याच्या घटनेने भीती निर्माण झाली आहे.

अनेक वेळा बिबट्या असल्याची माहिती देवूनही वनविभागाने गांभिर्याने न घेतल्याने आजची घटना घडल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने भोंग्यावरून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाने तातडीने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.