ETV Bharat / state

लाईफ ऑफ पाय..! कोरड्या विहिरीत बिबट्या, कुत्र्याने सोबत काढली रात्र

कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे लागलेल्या बिबट्याला आपला जीव वाचविण्यासाठी कुत्र्याबरोबरच कोरडया विहीरीत रात्र काढावी लागली. ही घटना संगमनेर तालुक्यातील चिखली राजापूर येथे पाहावयास मिळाली. यावेळी कुत्रा आणि बिबट्या यांची प्राण वाचवण्यासाठीची झुंज आणि परिस्थितीमुळे येणारी हतबल अवस्थाही नागरिकांना अनुभवता आली.

कोरड्या विहिरीत बिबट्या आणि कुत्र्याची झुंज
author img

By

Published : May 9, 2019, 2:28 PM IST

अहमदनगर - संकटात सापडल्यावर वाघदेखील शांत होऊन परिस्थितीला शरण येतो. याचे उत्तम चित्रण ईरफान खानची प्रमुख भूमिका असलेल्या लाईफ ऑफ पाय या चित्रपटात पाहायला मिळाले. त्याप्रमाणेच सुरुवातीला एका कुत्र्याची शिकार करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला त्या कुत्र्यासोबतच रात्र घालवण्याची वेळ आल्याची घटना संगमनेर तालुक्यातील चिखली राजापुरात पाहायला मिळाली. यावेळी कुत्रा आणि बिबट्या यांची प्राण वाचवण्यासाठीची झुंज आणि परिस्थितीमुळे येणारी हतबल अवस्थाही नागरिकांना अनुभवता आली.

कोरड्या विहिरीत बिबट्या आणि कुत्र्याची झुंज

शिकारीसाठी एक बिबट्या कुत्र्याचा पाठलाग करत होता. मात्र हा खेळ सुरू असतानाच हे दोघेही चिखली राजापूर येथील शेतकरी विष्णु खतोडे यांच्या घरामागील ५० फूट खोल कोरड्या विहिरीत पडले. या विहिरीत पडल्यानंतर मात्र, त्यांच्यातील संघर्ष शमला. कदाचीत वाचायचे असेल तर शांत बसणेच चांगले, असे त्यांनी ठरवले असावे.

कुत्रा आणि बिबट्या दोघेही १० तास विहिरीत अडकून होते. सकाळी घरी कुत्रा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध केली असता विहिरीतून कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला. त्यावेळी घराच्या मागे जावून विहिरीत डोकावले असता, विहिरीत बिबट्या आणि कुत्रा दिसून आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही गोष्ट कळवण्यात आली.

वनविभागाला माहिती कळताच या दोघांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. आधी ग्रामस्थांनी एक टोपली दोरीच्या सहाय्याने विहिरीत सोडली आणि कुत्र्याला बाहेर काढले. नंतर पिंजरा सोडत बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला बाहेर काढून त्याची रवानगी रोपवाटीकेत करण्यात आली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_कुत्र्याची शिकार करण्यासाठी मागे लागलेल्या बिबट्याला आपला जीव वाचविण्यासाठी कुत्र्या बरोबर रात्र एका कोरडया विहीरीत काढावी लागल्याची घटना समोर आलीय...संगमनेर तालुक्यातील चिखली राजापुर येथील एका विहीरीत कुत्रा आणि बिबटयाची झुंज पहावयास मिळालीय...

VO_भक्षासाठी बिबटे शेळी , कुत्रे आदींवर हल्ले करताना नेहमीच पहावयास मिळत... पण संकटात सापडल्यानंतर तेथे त्याचीही कशी दैना होते हे दृष्यावरून कळु शकते.. बिबट्याही संकटाला घाबरतो याचा प्रत्यय संगमनेर तालुक्यातील चिखली राजापूर येथे बघावयास मिळाला... येथील शेतकरी विष्णु खतोडे यांच्या घरामागील पन्नास फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत कुत्र्याचा पाठलाग करत असताना बिबटय़ाही विहीरीत पडला त्यानंतर काही काळ दोघेंही एकमेकांन वर धावुन जात होते ...एकमेकांना आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करत होते मात्र काही काळाने त्याच्यातील संघर्ष शमला आणि स्वत: ला वाचवण्याची कवायत सुरू झाली... वाचायच असेल तर शांत बसनेच चांगल अस त्यांनी ठरवल असाव .. कुत्रा आणि बिबट हे दोघेही दहा तास विहिरीत अडकुन होते. सकाळी घरी कुत्रा दिसत नसल्याने त्याची शोधाशोध केली असता विहीरीतुन कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज आला त्यावेळी घराच्या मागे जावुन विहीरीत डोकावले असता विहिरीत बिबटया आणि कुत्रा दिसून आले. त्यानंतर वनविभागाच्या अधिका-यांना ही गोष्ट कळवण्यात आली. वनविभागाला माहिती कळताच या दोघांना काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले..आधी ग्रामस्थांनी एक टोपली दोरीच्या सहाय्याने विहिरीत सोडली आणि कुत्र्याला बाहेर काढले नंतर पिंजरा सोडत बिबट्याला जेरबंद करत बाहेर काढुन त्यांची रवानगी रोपवाटीकेत करण्यात आली....

BITE_स्थानिक ग्रामस्थBody:9 April Shirdi LeopardConclusion:9 April Shirdi Leopard
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.