ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा दरड कोसळली... - चंदनापुरी घाट

पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१२ जुलै) रात्री अकराच्या सुमारास संरक्षक जाळ्यासह दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. या आठवड्यातील दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा दरड कोसळली
author img

By

Published : Jul 20, 2019, 4:45 PM IST

अहमदनगर - पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१२ जुलै) रात्री अकराच्या सुमारास संरक्षक जाळ्यासह दरडीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला. या आठवड्यातील दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. यामध्ये कोणतीही मोठी हानी झाली नसली तरीही सध्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाश्यांमध्ये अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरण करतेवेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी यामार्गावरील संगमनेर मधील चंदनापुरी, ऐकल आणि कर्हे घाटातील वळणे टाळण्यासाठी घाटाजवळील डोंगर फोडून नव्याने रस्ता तयार करण्यात आला. मात्र, डोंगर फोडतेवेळी सुरुंगाचा वापर केला गेल्याने डोंगर आणि त्यातील मिश्रीत माती-मुरूमाच्या भागाचा मजबुतपणा संपला. यामुळे संबंधित मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने धोका टाळण्यासाठी डोंगराला संरक्षक जाळ्या बसविल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरात पाणी झिरपू लागल्याने या संरक्षक जाळ्या तोडून डोंगराचा काही भाग कोसळू लागला आहे. शुक्रवारी रात्री देखील अशीच दरड नाशिकमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली. रात्रीची वेळ असल्याने यामार्गावर वाहतूक कमी होती, त्यामुळे जीवित अथवा वित्त हानी टळली.

पुणे-नाशिक महामार्गावर पुन्हा दरड कोसळली

दरड कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस,महामार्ग कर्मचारी, अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नाशिककडे जाणाऱ्या लेनवर मधोमध दरड कोसळल्याने प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, रात्रीच्या अंधारामुळे कामात अडथळे येत होते. सकाळी पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात आली असून, शनिवारी रात्री उशिरा पर्यंत मार्गावरील दरडीचा भाग हटविण्याचे काम सुरूच असल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती, तर छोटी वाहने जुन्या घाट रस्त्याने प्रशासनाने मार्गस्थ केली.

यापूर्वी रविवारी (७ जुलै) आणि गुरुवारी (११ जुलै) याच ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ पुणे - नाशिक महामार्गावर संगमनेर जवळील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (१२ जुलै) रात्री अकराच्या सुमारास पुन्हा एकदा संरक्षक जाळ्यासह दरडीचा मोठा भाग रस्त्यावर येऊन पडला. दरड कोसळण्याची आठवडा भरातील ही तिसरी घटना आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही मोठीहानी झाली नाही, असे असले तरी या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाश्यांमध्ये भीतीचे सवट निर्माण झाले आहे....

VO_नाशिक – पुणे मार्गाचे चौपदरीकरण करतेवेळी प्रवास सुखकर व्हावा यासाठी यामार्गावरील संगमनेर मधील चंदनापुरी, ऐकल आणि कर्हे घाटातील वळणे टाळण्यासाठी या घाटालगत डोंगर फोडून नव्याने घाटरस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र डोंगर फोडतेवेळी सुरुंगाचा वापर केला गेल्याने डोंगर आणि त्यातील मिश्रीत माती व मुरुमाच्या भागाचे मजबुतीकरण नाहीसे झाले. त्यामुळे सबंधित मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने धोका टाळण्यासाठी डोंगराला संरक्षक जाळ्या बसविल्या.
गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे डोंगरात पाणी झिरपू लागल्याने या संरक्षक जाळ्या तोडून डोंगराचा काही भाग कोसळू लागला आहे. शुक्रवारी रात्री देखील अशीच एक दरड नाशिकमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने यामार्गावर वाहतूक कमी होती त्यामुळे जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस,महामार्ग कर्मचारी, अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नाशिककडे जाणाऱ्या लेनवर मधोमध दरड कोसळलेल्याने प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली. मात्र रात्रीच्या अंधारामुळे त्यात अडथळे येत होते. सकाळी पुन्हा आठवाजता ही मोहीम सुरु करण्यात आली असून शनिवारी रात्री उशिरा पर्यंत मार्गावरील पडलेला दरडीचा भाग हटविण्याचे काम सुरूच असल्याने या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती तर छोटी वाहने जुन्या घाट रस्त्याने प्रशासनाने मार्गस्त केली. यापूर्वी रविवारी (७ जुलै) आणि गुरुवारी (११ जुलै) याच ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही या घटनेची माहिती घेत प्रशासनाला मदत कार्याच्या सूचना दिल्या....Body:MH_AHM_Shirdi_ Stone Kosaly_20_Visuals_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_ Stone Kosaly_20_Visuals_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.