ETV Bharat / state

अहमदनगरमधील मुख्यमंत्र्यांची जमीन वादात, मोजणी करणाऱ्यास आदिवासी बांधवांनी पिटाळले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी

जमिनीच्या उताऱ्यावर नाव असलेल्यांपैकी संदीपकुमार जैन आज तेथे मोजणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी लोकांनी आंदोलन केले. त्यांना मोजणी न करू देता संबंधितांना पिटाळून लावले. आज भर पावसात झालेले हे आंदोलन पाहून जैन व संबंधित लोक निघून गेले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार मुकेश कांबळे उपस्थित होते.

land dispute name of chief minister in akole
अकोले तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या नावे जमीन वादात
author img

By

Published : Jul 8, 2020, 6:46 AM IST

(शिर्डी) अहमदनगर - अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणा जवळील मुरशेत गावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने 22 गुंठे जमीन असल्याची चर्चा आहे. त्या जमिनीची आज मोजणी करण्यासाठी आलेल्या एकाला आदिवासी लोकांनी पिटाळून लावल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान नामनिर्देशनपत्रामध्ये संपत्ती जाहीर करताना नगर जिल्ह्यातील जमिनीचा उल्लेख केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे सुमारे 22 गुंठे असलेले हे प्लॉट अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाजवळील मुरशेत या गावातील आहेत. मुख्यमंत्र्यांबरोबरच इतरही पाच-सहा जणांच्या नावे तेथे प्लाॅट आहेत. त्या जमिनी वर्षानुवर्षे आदिवासी लोक वापरतात त्यांच्याच आजोबा-पणजोबांनी या जमिनी 1960 साली सरकारला विकल्या होत्या. तेथे भंडारदरा हिलस्टेशन होण्यासाठी सरकारने विशेष बाब म्हणून कलाकार, लेखक, कवी अशा लोकांना या जमिनी दिल्या होत्या. त्यामुळे उताऱ्यांवर संबंधित लोकांची नावे आहेत. परंतु 55 वर्ष उलटूनही या व्यक्ती तिकडे फिरकल्या नाहीत. या जमिनी राखल्या व त्यातून आपले उपजीविकेचे साधन तयार केले आहे. त्यामुळे त्या जमिनी सोडण्यास आदिवासी तयार नाहीत. जमिनीच्या उताऱ्यावर नाव असलेल्यांपैकी संदीपकुमार जैन आज तेथे मोजणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्त्वाखाली आदिवासी लोकांनी आंदोलन केले. त्यांना मोजणी न करू देता संबंधितांना पिटाळून लावले. आज भर पावसात झालेले हे आंदोलन पाहून जैन व संबंधित लोक निघून गेले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार मुकेश कांबळे उपस्थित होते.

वर्षानुवर्षे या जमिनींवर आदिवासी लोक आपला उदर्निवाह करत आहेत. ज्यांच्या नावे जमिनी आहेत, ते लोक कधीही फिरकले नाही, की त्यांनी शासनाकडे त्याचे पैसेही भरले नाहीत. काही लोकांनी तब्बल 40 वर्षानंतर थोडेफार पैसे भरले परंतु कोणीही इकडे फिरकले नाही. त्यामुळे त्यांचा या जमिनीशी काही संबंध नसल्याचे आदिवासी नागरिक म्हणाले.अत्यल्प दरात त्या वेळी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांचेच वंशज या जमिनी परत मागत आहेत. त्यामुळे आता या जमिनी आदिवासी लोक देणार नाहीत. ही जमीन नवीन शर्थीनुसार आहे आम्ही घेतलेले पैसे परत देण्यास तयार आहोत, अशा भावना आदिवासी आंदोलकांनी व्यक्त केल्या. या जमिनीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही काही प्लाॅटस आहेत. ते आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे होते. ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर आहेत. तेथे मुख्यमंत्र्यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक करावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. त्यांनी हा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचे स्वागतच करू अशी भूमिका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अशोक भांगरे यांनी व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.