अहमदनगर - घामाचा दाम मिळावा यासाठी आज पुन्हा एकदा अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्याचा सीमेवरील लाखगंगा गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले. दूध डेअरींना दूध न घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. गावाचे दैवत हनुमान मंदिरातील मूर्तीला दुधाचा अभिषेक घालत काल (शुक्रवारी) 31 जुलैला सायंकाळी 6 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली.
राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना व्हयरस सुरू झाल्यापासून दुधाला प्रति लिटर मागे केवळ पंधरा ते वीस रुपये भाव मिळत आहे. दुधाला किमान 30 ते 35 रुपय प्रति लिटर भाव मिळावा यासाठी शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावा जवळील लाखगंगा गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुधाला हमीभाव मिळण्यासाठी बेमुदत दूध संप आंदोलन सुरू केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील्या वैजापूर तालुक्यातील लाखगंगा गावाने 1 ऑगस्टपासून दूध आंदोलनाचा ईशारा राज्य सरकारला दिला होता. त्या नंतर राज्यात दूध आंदोलनाची चळवळ तीव्र स्वरूपात उभी राहिली आहे. लाखगंगा गावाने राज्य सरकारला दुध दरवाढी संदर्भातला निर्णय जाहीर करण्यासाठीची दिलेली वेळ 31 जुुलैला संपल्याने संध्याकाळी सहा वाजता गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपले दूध डेअरीला न घालता आपल्या गावातील ग्राम दैवत हनुमान मूर्तीला दुधाचा अभिषेक घातला. त्या नंतर मंदिरा समोर एका कढाईत दूध आटवित ते गावातील नागरिकांना मोफत वाटप करत आंदोलनाला सुरवात केली आहे. काल 31 जुलै पासून सुरू झालेले आंदोलनाकडे सरकारने लक्ष न दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा ईशार दुग्ध उत्पादकांनी दिलाय.